साईमत, कासोदा, ता.एरंडोल : वार्ताहर
एरंडोल तालुक्यातील उत्राण येथील शेतकरी कुटूंबातील शेरॉन देशमुख याने एलएलएम पदवी जळगावच्या मन्यार लॉ कॉलेजमधून ‘ए’ ग्रेड घेऊन मिळविली आहे. मुस्लीम देशमुख समाजातून एलएलएम ‘ए’ ग्रेडसह उत्तीर्ण होणारा तो एकमेव ॲडव्होकेट ठरला आहे. त्याने कायद्याची एलएलबी परीक्षाही ९४.७ टक्के मार्क घेऊन प्राविण्यासह उत्तीर्ण केली होती. त्याचे प्राथमिक शिक्षण उत्राण येथील जि. प. शाळेत तर बीए पदवीचे शिक्षण एमएम कॉलेज, पाचोरा येथे झाले आहे. विशेष म्हणजे पहिली तर थेट मास्टर डिग्री लॉ एलएलएम पर्यंतचे पूर्ण शिक्षण शेरॉनने कोणताही क्लासेस न लावता कठोर परिश्रमातून यश संपादन केले आहे. शेरॉन हा उत्राण येथील वार्ताहर अ.हक देशमुख यांचा चिरंजीव आहे.