साईमत, जळगाव : प्रतिनिधी
विमुक्त जाती मुक्ती दिवसानिमित जळगाव कंजरभाट समाज समाजमंदिर येथे नुकतेच वृक्षारोपण करण्यात आले. बालाणी परिवाराच्या सौजन्याने वृक्षांसाठी ट्री गार्ड देण्यात आले. तसेच वृक्ष संगोपनाची जबाबदारी सदस्यांना देण्यात आली.
याप्रसंगी कंजरभाट समाजाचे ज्येष्ठ नेते बिरजू नेतलेकर, विजय दहियेकर, शाम गारुंगे, कंजरभाट समाज युवा फाउंडेशनचे अध्यक्ष विजय अभंगे, कार्याध्यक्ष शशिकांत बागडे, उपाध्यक्ष सचिन बाटुंगे, सचिव राहुल नेतलेकर, सहसचिव संतोष रायचंदे, खजिनदार योगेश बागडे, गौतम बागडे, संदीप गारुंगे, क्रांती बाटुंगे, अनिल नेतले, वीर दहियेकर, संदीप बागडे(कालू), जयेश माछरे, संदीप बागडे, पंकज गागडे, गणेश बागडे, अंकुश माछरे, अर्जुन माछरे, विनय नेतले, अंकुश मलके, सुदाम बागडे, चिंटू बागडे, निहाल नेतले यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.