Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»दुसऱ्या धर्मातील मैत्रीणीबरोबर फिरणाऱ्या हिंदू तरुणाला मारहाण
    क्राईम

    दुसऱ्या धर्मातील मैत्रीणीबरोबर फिरणाऱ्या हिंदू तरुणाला मारहाण

    saimatBy saimatAugust 31, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अहमदाबाद :

    दुसऱ्या धर्मातील मैत्रिणीबरोबर फिरणाऱ्या एका हिंदू तरुणाला जमावाकडून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुजरातच्या अहमदाबादमध्ये हा प्रकार घडला आहे. २६ ऑगस्ट रोजी ही घटना घडली असून, तरुण आणि तरुणी शहरात फिरत असताना जमावाने त्यांना थांबवलं. यानंतर काहीजणांनी तरुणाला कानशिलात लगावल्या. इतकंच नाही तर तरुणीचा बुरखा वारंवार खेचत चेहरा झाकण्यापासून थांबवलं. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

    व्हायरल झालेल्या या व्हिडीओत जमावातील काही तरुण दोघांना जाब विचारताना दिसत आहेत. तरुणाला मारहाण केली जात असून, बुरखा घातलेल्या मुस्लीम तरुणीलाही खडसावत आहेत. यावेळी ते तरुणाला ‘मुस्लीम तरुणीसह फिरण्याची हिंमत कशी झाली?’ अशी विचारणा करताना दिसत आहेत.

    या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अहमदाबाद पोलिसांनी कारवाई केली असून, तिघांना अटक केली आहे. अटक केलेल्यांची नावं अकबर पठाण, फैजन शेख आणि हुसेन सय्यद अशी आहेत. त्यांच्याविरोधात आयपीसीमधील वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

    याआधी सोमवार, २८ ऑगस्ट रोजी, वडोदरा पोलिसांनी मुस्तकीम शेख, बुरहान सय्यद आणि साहिल शेख या तिघांना आंतरधर्मीय जोडप्यांना लक्ष्य करणे, त्यांचा छळ करणे आणि धार्मिक गटांमध्ये शत्रुत्व निर्माण करण्यासाठी त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केल्याबद्दल अटक केली होती.

    नंतर, या प्रकरणावर बोलताना, अहमदाबाद पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपींनी एका महिलेला लक्ष्य केलं होतं. ही महिला दुसऱ्या धर्माच्यापुरुषासोबत दिसली असता त्यांनी व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि त्याचा वापर ब्लॅकमेल करण्यासाठी केला गेला. पोलिसांनी त्यांचे मोबाईल फोन जप्त केले असून, सर्व ऑडिओ आणि व्हिडिओ रिकव्हर करण्यासाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (एफएसएल) कडे पाठवले आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Jalgaon, Erandol Taluka:भातखेडा हादरला तरुणाचा धक्कादायक आत्महत्येचा प्रकार उघडकीस

    March 5, 2026

    Jalgaon:जळगावमध्ये ३४ जप्त वाहनांचा जाहीर लिलाव १२ मार्च रोजी तहसील कार्यालयात

    March 5, 2026

    Yaval Sakli : यावल साकळी फाटा कुत्र्यामुळे नियंत्रण सुटले, युवकाचा मृत्यू

    March 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.