साईमत, प्रतिनिधी जळगाव
श्रावण पौर्णिमा ही नारळी पैर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन आणि संस्कृतदिन म्हणून साजरी करण्यात येते. बहिण-भावाच्या नात्याचे प्रतीक, प्रेम, आणि आपुलकी दृढ करण्यासाठी, रेशमाच्या धाग्यातून एकमेकांचे रक्षण करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना आपली संस्कृती व संस्कृत भाषेचे महत्व समजण्यासाठी मंगळवारी कै.श्रीमती ब.गो.शानभाग विद्यालयात संस्कृतदिन आणि रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील, गुरुकुल प्रमुख शशिकांत पाटील, जगदीश
चौधरी आणि विभाग प्रमुख राजेंद्र पाटील यांची उपस्थिती होती.
दोनही विभागात सुरुवातीला विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील, गुरुकुल प्रमुख शशिकांत पाटील, जगदीश चौधरी आणि विभाग प्रमुख सूर्यकांत पाटील, राजेंद्र पाटील यांच्या शुभहस्ते माता सरस्वती देवीच्या प्रतिमेचे आणि संस्कृत ग्रंथाचे पूजन करण्यात आले.
गीत संतोष जोशी यांनी गायले. सूत्रसंचालन शुभांगी नारखेडे तर दुपार विभागात विद्यालयाचे शिक्षक रविंंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी केले. प्रास्ताविकात इयत्ता ५वीची शालेय विद्यार्थिनी पियुषा पाटील तर दुपार विभागात अनिता शर्मा यांनी संस्कृत दिन आणि रक्षाबंधनाचे महत्व विषद केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील यांनी सकाळ विभागातील विद्यार्थ्यांना यानिमित्त मार्गदर्शन केले. दोन्ही सत्रात हरितसेना विभागातर्फे मान्यवरांच्या हस्ते वृक्षांना राखी बांधून त्यांचे संवर्धन करण्याची शपथ घेतली. तसेच विद्यार्थ्यांना आपल्या घराजवळील झाडांना राखी बांधून त्याचे संवर्धन करण्याचे आवाहन केले.