साईमत, चाळीसगाव : ( मुराद पटेल )
येथील शहर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी संदीप पाटील चाळीसगावला रुजू झाल्यापासून एकही दिवस असा गेला नाही ज्या दिवशी गुन्हेगारावर कारवाई नाही. दररोज कोणत्या ना कोणत्या गुन्हेगारावर कारवाई सत्र सुरूच आहे. काही घटना तर अश्या त्यांच्या काळात घडल्या काही तासातच गुन्ह्यांचा तपास उलगडला आहे. ‘अधिकारी असावा तर असा’, असा सूर चाळीसगाव शहर जनतेतून संदीप पाटील यांच्याबद्दल उमटत आहे.
पोलीस निरीक्षक संदीप पाटील हे नेहमीच पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, सहाय्यक पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी अभयसिंग देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आपले कर्तव्य करत असतात. त्यांना नेहमीच मोलाचे सहकार्य आपल्या सहकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक पी.एस.आय. व डीबीचे पी.एस.आय. व डीबीचे पोलीस कर्मचारी व गोपनीय पोलीस कर्मचारी यांच सहकार्य असल्याने त्यांनी अनेक गुन्हेगारांचा पर्दाफाश केला आहे.
शहराला लावली चांगली शिस्त
गुन्ह्यांची पार्श्वभूमीही आधी पोलीस निरीक्षक संदीप पाटील हे पडताळून बघतात. गुन्हेगार असल्याची खात्री पूर्ण तपासून गुन्हेगारांवर कारवाई करतात. त्यांच्या चांगल्या स्वभावामुळे अनेक जण त्यांचे चाहते आहेत. ते चाळीसगाव पोलीस स्टेशनला हजर झाल्यापासून शहराला एक चांगली शिस्त लावली आहे. त्यात दारोदारी दुकानात सीसीटीव्ही कॅमेरा, विद्यार्थ्यांना पोलीस भरती पूर्व मार्गदर्शन असे अनेक उपक्रम राबविले आहे. सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात अनेक कार्यक्रमासाठी संदीप पाटील हे उपस्थित असतात. भाषा कौशल्य, चांगला स्वभाव अशी संदीप पाटील यांची शहरात वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. जो गुन्हेगार आहे त्याला शिक्षा ते देतात, हाही त्यांच्या कामाचा भाग ठरत आहे.