Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»मुलाला शिक्षणासाठी मामाकडे पाठविल्याने पत्नीचा खून करून आत्महत्येचा रचला बनाव
    क्राईम

    मुलाला शिक्षणासाठी मामाकडे पाठविल्याने पत्नीचा खून करून आत्महत्येचा रचला बनाव

    saimatBy saimatAugust 27, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सोलापूर :

    मुलाला शिक्षणासाठी मामाकडे पाठविल्याचा राग मनात धरून दारूड्या नवऱ्याने पत्नीचा खून केला आणि तिने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव केल्याचा प्रकार करमाळा शहरात घडला. पतीला पोलिसांनी अटक केली आहे. उमा प्रफुल्ल पवार (वय ३२, रा. फंड गल्ली, करमाळा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

    याप्रकरणी तिचा भाऊ दादा मारुती चव्हाण (वय ३५, रा. लऊळ, ता. माढा) याने करमाळा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्याचा मेव्हणा प्रफुल्ल विठ्ठल पवार (वय ४१) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

    नोंद झालेल्या फिर्यादीनुसार आरोपी प्रफुल्ल पवार यास दारूचे व्यसन असून तो कुटुंबाची जबाबदारी सांभाळत नव्हता. त्यामुळे मुलांचे पालनपोषण होणे कठीण झाले होते. त्यामुळे पत्नी उमा हिने तीन वर्षांपूर्वी थोरला मुलगा महेश यास शिक्षणासाठी मोहोळ येथे मामाकडे पाठविले होते. परंतु पती प्रफुल्ल याचा त्यास विरोध होता. याच कारणावरून तो पत्नी उमा हिला त्रास द्यायचा. दारूच्या नशेत तो घरात नेहमीच पत्नीला मारझोड करायचा परंतु मुलाच्या शिक्षणासाठी ती पतीचा त्रास सहन करायची. गेल्या आठवड्यात नागपंचमीसाठी मुलगा महेश करमाळ्यात घरी आला असता प्रफुल्ल याने त्यास आणि पत्नीला जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती.त्यामुळे घरात धुसफूस सुरूच होती. दरम्यान, प्रफुल्ल याने पत्नी उमा हिच्याशी भांडण काढून तिच्या डोक्यात धारदार हत्याराने प्रहार केल्याने प्रचंड रक्तस्त्राव होऊन ती बेशुद्धावस्थेत निपचित पडली होती.

    ही माहिती घराबाहेर मित्रांसह खेळणाऱ्या मुलांना समजताच ती घराकडे धावून आली. तेव्हा आई उमा ही घरातील स्वच्छतागृहाजवळ रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडली होती. वडील प्रफुल्ल याने आईने गळफास घेतला आणि खाली पडल्यामुळे मरण पावल्याचे मुलांना सांगितले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी आले. मृताच्या न्यायवैद्यक तपासणी अहवालानुसार हा आत्महत्येचा नव्हे, तर खुनाचा प्रकार असल्याचे आणि हा खून प्रफुल्ल यानेच केल्याचे निष्पन्न झाले. सहायक पोलीस निरीक्षक एम. एन. जगदाळे हे पुढील तपास करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Pachora : पाचोर्‍यात वॉटर हिटरचा शॉक फर्निचर कारागिराचा दुर्दैवी मृत्यू

    March 11, 2026

    Jalgaon: जळगावात वडिलांच्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी घरकुल चौकात गोळीबार

    March 11, 2026

    Chalisgaon : चाळीसगावात आरपीएफ जवानाच्या घरात धाडसी चोरी

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.