बाबामहाराज तराणेकर यांचे हस्ते मुष्टीकर यांचा जीवन गौरव ग्रंथ …कृतार्थ’चे थाटात प्रकाशन

0
32

जळगाव ः प्रतिनिधी

परमपूज्य डॉ. बाबासाहेब ऊर्फ चिदानंद अवधूत बाबामहाराज तराणेकर यांचे हस्ते त्यांचे शिष्य मुष्टीकर काका यांचे सन्मानार्थ कृतार्थ पुस्तिकेचा प्रकाशन पुणे येथे दि. २६ ऑगस्ट रोजी थाटात झाला. प्रस्तुत सोहळ्यास जयश्रीवहीनी तराणेकर, राहुल किर्लोस्कर तथा माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.प्रस्तुत प्रसंगी लेखिका तथा कर्तृत्व अग्रणी जयश्री वहीनी तराणेकर यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास तेजस तराणेकर व भाग्यश्रीताई तराणेकर, राहुल मुष्टीकर यांचे सक्रिय योगदान लाभले.

परमपूज्य बाबामहाराजांनी गुरूवर्य नानामहाराज तराणेकर यांचे कार्यातील पैलू व त्यातील कार्याचे वैविध्यपूर्ण सामर्थ्य,संपन्नतेचे चैतन्य शिष्यांमध्ये पहावयास मिळते यासह श्री. मुष्टीकर यांचे विज्ञान, तत्वज्ञान-निष्ठतेने होणाऱ्या कार्याचा सन्मान करताना …कृतार्थ’ प्रकाशन प्रसंगी आशीर्वादपूर्ण गौरवोद्गार काढले. याप्रसंगी व्यासपीठासह उपस्थित शुभेच्छुकांनी श्री. मुष्टीकर काका यांचे अभिनंदन केले. अखिल भारतीय त्रिपदी परिवार, इंदौरसह जगभरातील ३५० शाखांमधून श्री. मुष्टीकर यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here