छावा मराठा युवा महासंघाच्या कायदेविषयक सल्लागारपदी ॲड. राजेश पावसे

0
16

साईमत, प्रतिनिधी, जळगाव
छावा मराठा युवा महासंघाची पदाधिकारी नियुक्तीची बैठक संघटनेचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष अमोल कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी पद्मालय विश्रामगृह येथे घेण्यात आली. या बैठकीत संघटनेत प्रवेश करणाऱ्या प्रमुख व्यक्तींची नियुक्ती विविध पदांवर करण्यात आली. यामध्ये अमोल कोल्हे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन कायदेविषयक सल्लागारपदी शिवसेना शिंदे गटाचे लिगल सेलचे जिल्हा प्रमुख ॲड.राजेश पावसे यांची नियुक्ती करण्यात आली.

महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचीही नियुक्ती

तसेच महिला आघाडीच्या महानगरध्यक्षा निलूताई इंगळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन उपाध्यक्षपदी नीताताई सांगोळे व विद्याताई झनके यांची तर महिला आघाडीच्या महानगर कार्यकारिणी सदस्यपदी योगिताताई सुतार, उज्ज्वलाताई सपकाळे , चंदाताई इंगळे व श्रीमती सिंधुबाई शेगोकर यांची नियुक्ती करण्यात आली. याप्रसंगी संघटनेचे कायदेविषयक सल्लागार ॲड विक्रम महाले, रिक्षा युनियनचे महानगराध्यक्ष शांतारामभाऊ अहिरे , जिल्हा कार्यकारिणी सदस्य कृष्णा जमदाडे, किरण ठाकूर, प्रांजल नेमाडे, उज्ज्वल पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here