साईमत, जळगाव : प्रतिनिधी
पत्रकारांच्या विविध मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष्य वेधण्यासाठी व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेतर्फे प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी,२८ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन होणार आहे.
जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश उज्जैनवाल, कार्याध्यक्ष डिगंबर महाले, साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नवाल, महानगराध्यक्ष राजेश यावलकर, रेडिओ विंगचे अध्यक्ष अमोल देशमुख, ऊर्दू विंगचे अध्यक्ष मुफ्ती हारून नदवी, डिजिटल विंगचे अध्यक्ष विजय वाघमारे, ज्येष्ठ पत्रकार विजय पाठक यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. जिल्ह्यातील पत्रकारांनी आंदोलनात सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेने केले आहे.