Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»सीसीटीव्हीमुळे पोलिसांनी चोरटा पकडला
    क्राईम

    सीसीटीव्हीमुळे पोलिसांनी चोरटा पकडला

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 24, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

    शहरातील घाट रस्त्यावरील एका कृषी केंद्राच्या दुकानातून अज्ञाताने ३५ हजारांचा रोकड लंपास केल्याची घटना घडली होती. त्यानंतर त्याची नोंद होताच शहर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली. त्यानंतर सीसीटीव्हीच्या साहाय्याने आरोपीला ताब्यात घेतले आहे. आरोपीतास अटक केल्यामुळे मार्केट परिसरातील सर्व व्यापारी तसेच दुकान मालक प्रदीप देशमुख यांनी समाधान व्यक्त करुन पोलिसांना चांगल्या कामाबद्दल आभार मानले आहेत. संशयित आरोपीला न्यायालयात हजर केल्यावर त्याला २५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

    सविस्तर असे की, चाळीसगाव शहरातील घाटरस्त्यावरील फकीराव रामराव कंपनी खते व बियाण्या‌’च्या दुकानात १९ ऑगस्ट रोजी दुपारी पावणे एकच्या सुमारास कोणी नसल्याचा गैरफायदा घेवून अज्ञात चोरट्याने दुकानाच्या ड्रावरमधुन ३५ हजार रुपये चोरी केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी फिर्यादी सतीष बाबुराव भालारे (रा. चाळीसगाव) यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. ही चोरी भर बाजारात गर्दीच्या ठिकाणी झाल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये असुरक्षितता वाटू लागली. अशातच शहर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी एका पथकाची नियुक्ती केली. त्यामध्ये प्रामुख्याने पी.एस.आय. सुहास आव्हाड, पो.हे.कॉ. योगेश बेलदार, पो.ना. दीपक पाटील, पो.कॉ. निलेश पाटील, अमोल भोसले, गणेश कुवर, नंदकिशोर महाजन, प्रवीण जाधव, शरद पाटील, मोहन सूर्यवंशी, विनोद खैरनार अशांना आरोपी शोधाबाबत सूचना दिल्या.

    इतर चोरीचींही कबुलीची शक्यता

    पथकाने घटनास्थळी जाऊन दुकानातील सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्याची पाहणी करताना एक संशयित हा चोरी करतांना दिसून आला. संशयिताबाबत गोपनीय माहिती काढण्यात आली. तेव्हा तो ७ वी गल्ली क्रांतीवीर चौक पारोळा रोड, धुळे येथे राहत असल्याबाबत माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतले. आनंदा राजु सरोदे असे संशयित आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी २२ ऑगस्ट रोजी त्याला ताब्यात घेतले. आरोपीतास विश्वासात घेवून विचारपूस केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली देवून याव्यतिरिक्त चाळीसगाव शहरातील एका भांडे विक्री करणाऱ्या दुकानातून एक मोबाईल फोन चोरी केल्याची अजून कबुली दिली आहे. अजून चोरीबाबत काही कबूली देण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.

    ‘एक कॅमेरा पोलिसांसाठी’ उपक्रमास सहकार्य करावे

    चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे चोरीचे गुन्हे रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या आदेशान्वये तसेच अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहा. पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनखाली गुन्हे शोध पथकाची स्थापना केली आहे. पथक स्थापन झाल्यापासून चोरीच्या गुन्ह्यांना बऱ्यापैकी आळा बसला आहे. गुन्हे उघकीस आणण्याचे प्रमाण वाढले आहे. गुन्हे होऊ नये, म्हणून व्यापाऱ्यांनी दुकानात संशयितांवर लक्ष ठेवून दुकानांच्या सुरक्षेकामी सीसीटीव्ही कॅमेरा लावून पोलिसांना ‘एक कॅमेरा पोलिसांसाठी’ उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. तपास पो.हे.कॉ. योगेश बेलदार, पो.कॉ. निलेश पाटील करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Chalisgaon : चाळीसगाव शहरात भरवस्तीत घरफोडी; सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास

    February 26, 2026

    Jalgaon:जळगाव शहरात भरदिवसा ८ लाखांची रोकड लंपास; दुचाकी डिक्की फोडून चोरटा फरार

    February 26, 2026

    Chopra:१० हजारांच्या कर्जासाठी २ लाख व्याज भरूनही तरुणाची आत्महत्या

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.