Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्रीडा»भडगाव तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत आदर्श कन्या विद्यालयास तिहेरी मुकूट
    क्रीडा

    भडगाव तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत आदर्श कन्या विद्यालयास तिहेरी मुकूट

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 23, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, भडगाव : प्रतिनिधी

    पुणे क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जळगाव जिल्हा क्रीडा कार्यालय तथा भडगाव तालुका क्रीडा समितीच्या संयुक्त विद्यमाने रजनीताई देशमुख कला-वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, भडगाव येथील क्रीडांगणावर भडगाव तालुकास्तरीय मुलींच्या खो-खो स्पर्धा नुकत्याच घेण्यात आल्या. स्पर्धेत १४ वर्षाआतील मुलींच्या गटात आदर्श कन्या विद्यालयाच्या संघाने जवाहर हायस्कूल विरुध्द डावाने विजय मिळविला तर १७ वर्षाआतील मुलींच्या गटात आदर्श कन्या विद्यालयाने एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात माध्यमिक विद्यालय, वाडे संघाचा पराभव करत जेतेपद प्राप्त केले. वाडे विद्यालयास उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले तर गटात अँग्लो उर्दू हायस्कूल, भडगाव हा संघ तृतीयस्थानी राहिला. १९ वर्षाआतील मुलींमध्ये आदर्श कन्या विद्यालय, भडगावचा संघ विजयी ठरला.

    यशस्वीतेसाठी क्रीडा समन्वयक प्रा.डॉ.सचिन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा शिक्षक रवींद्र महाजन, निलेश मोरे, भिमसिंग परदेशी, रहिम बागवान तसेच महाविद्यालयाचे खेळाडू शुभम निकुंभ, हर्षल पाटील, तेजस पाटील, रवि काळे, जगदीश पाटील, ज्योती पाटील, पूजा महाले आदींनी परिश्रम घेतले. स्पर्धेस पंच म्हणून राष्ट्रीय खो-खो पंच प्रा.प्रेमचंद चौधरी यांनी काम पाहिले. स्पर्धेतील विजयी-उपविजयी संघाचे रजनीताई देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.एन.गायकवाड,क्रीडा संचालक प्रा.डॉ.दिनेश तांदळे, प्रा.डॉ.अतुल देशमुख, मुख्याध्यापक नाजीम, प्रा.कांबळे, प्रा.चौधरी यांनी कौतुक केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon : नैराश्यातून तरुण विद्यार्थ्याची आत्महत्या प्राचार्यांवर गंभीर आरोप

    February 16, 2026

    Bhusawal-Jamner : भुसावळ-जामनेर परिसरात धाडसी कारवाई; चोरीच्या तीन मोटारसायकलींसह दोन तरुण गजाआड

    January 30, 2026

    Bhadgaon : भडगावमध्ये साधूवेशातील भामट्यांचा धक्कादायक फसवणूक प्रकार; दाम्पत्याची सोन्याच्या अंगठ्या लंपास

    January 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.