युवापिढीसाठी स्मारक राष्ट्रभक्तीची प्रेरणा देणारे ठरेल : खा. हेमंत खोडसे

0
14

साईमत, देवळाली कॅम्प । प्रतिनिधी

भारत देश हा आपल्या परिवाराचा हिस्सा असून खऱ्या अर्थाने परिवाराचे संरक्षण सैनिक करत असतात. हेच सैनिक आपल्या परिवाराचा, समाजाचा त्याग करुन देशाच्या संरक्षणासाठी जीवाची पर्वा न करता सातत्याने लढत असल्याने त्याचे योगदान महत्त्वाचे आहे. हे स्मारक युवापिढीसाठी राष्ट्रभक्तीची प्रेरणा देणारे ठरणार असल्याचे प्रतिपादन खा. हेमंत गोडसे यांनी केले. लहवित गावचे रहिवासी शहीद संतोष गायकवाड यांचे सुमारे आठ लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या स्मारकाच्या अनावरणप्रसंगी तेे बोलत होते. व्यासपीठावर कर्नल संग्राम शिंदे, एअर फोर्सचे वॉरंट ऑफिसर आर. के. विश्‍वकर्मा, मृत्युंजय कुमार, कॅप्टन देवानंद महांता, लेफ्टनंट एस. सत्पथी, सरपंच सत्यभामा लोहकरे, तनुजा घोलप, शहीद गायकवाड यांचे वडील विश्‍वनाथ गायकवाड, आई मैनाबाई गायकवाड, शिवा भागवत, आदींसह मान्यवर उपस्थित होते.

आर्टिलरी सेंटरचे कर्नल सुभाष घोडगिरी यांनी देशसेव्ोप्रती भावना जोपासणारे गाव व लोकप्रतिनिधी यांचा अनोखा संगम पाहायला मिळाल्याचे नमूद केले.डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर देशभक्त व वैष्णव भक्त ज्या मातेच्या कुशीत जन्म घेतात ती धर्मात धन्य मानली गेली आहे. आजही लहवित गावाचे शेकडो जवान देशाची सेवा करत असल्याचा अभिमान असल्याचे सांगितले. प्रास्ताविकेतून हवालदार विजय जाधव यांनी शहीद गायकवाड यांच्या देशसेव्ोच्या कार्याची माहिती विषद केली. याव्ोळी मान्यवरांच्या हस्ते शहीद संतोष गायकवाड यांच्या पत्नी राणी गायकवाड यांना सेनाध्यक्ष जनरल मनोज पांडे यांनी दिलेले सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. तसेच वीरमाता, वीरपिता यांच्यासह वीरनारी, वीरमातांचाही सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सकाळी शाळेतील विद्यार्थ्यांनी ७६ फूट तिरंगा ध्वजाची ढोलताशांच्या गजरात गावातून मिरवणूक काढण्यात आली. तसेच लष्करी व एअर फोर्सच्या विविध विभागातील बटालियनच्या प्रमुख अधिकारी, जवानांनी स्मारकास पुष्पचक्र अर्पण केले. कार्यक्रमास शहीद गायकवाड यांचे भाऊ प्रमोद गायकवाड, सचिन गायकवाड, शहीद गायकवाड यांचा मुलगा अविनाश गायकवाड, शंकर मुठाळ, विनोद जगताप, संदीप मुठाळ, गजीराम मुठाळ, कृष्णा गायकवाड आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचलन तथा आभार कवी विजयकुमार कर्डक यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here