Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»कृषी»पावसाची पाठ; दुबार पेरणीचे संकट !
    कृषी

    पावसाची पाठ; दुबार पेरणीचे संकट !

    SaimatBy SaimatAugust 21, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, नाशिक: प्रतिनिधी
    पावसाळा सुरू होऊन अडीच महिन्यानंतरही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.
    कपाशी, मका, बाजरी, सोयाबीन आदी पिके जागेवरच करपल्याने शेतकऱ्यांना पुन्हा बियाणे खरेदी करण्याची व्ोळ आल्याचे चित्र जिल्ह्याभरात दिसून येत आहे. जिल्ह्यात खरिपाची 91.58 टक्के पेरण्या झाल्या आहेत. जुलैअखेर खरिपाची पेरणी होते. त्यानंतर लेट खरीप व रब्बीचा हंगाम सुरू होतो. या काळात लाल कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात होते.हा कांदा चांदवड, येवला, नांदगाव, मालेगाव या भागात मोठ्या प्रमाणात घेतला जातो. तर कळवण, देवळा, सटाणा या भागात लाल कांद्यासह उन्हाळ कांद्याची लागवड होते. लाल कांदा (पोळ) लागवडीयोग्य रोप तयार झालेले असले तरी अत्यल्प पावसामुळे विहिरींना पाणी आलेले नाही. त्यामुळे कांद्याची लागवड रखडली असून, रोपं जागेवरच पिवळी पडत आहेत. जूनमध्ये झालेल्या रिमझिम पावसाच्या भरवशावर मका व कपाशीची लागवड केली. पण पावसाअभावी ही पिकेही शेतकऱ्यांच्या हातातून गेले आहे. गुडघ्याएवढ्या उंचीची ही पिके जागेवरच करपत असल्याने गुरांना चारा म्हणून त्याचा वापर केला जात आहे. जूनमध्ये पेरणी केलेली बाजरी व्यवस्थितरीत्या उगवली नाही म्हणून अनेक शेतकऱ्यांनी जुलैमध्ये दुबार पेरणी केली. पाऊस न पडल्यामुळे बाजरीही जागेवरच सुकली. यात मालेगाव, नांदगाव, येवला, चांदवड, बागलाण, सिन्नर या तालुक्यांमधील बहुतांश भागाची पिके हातातून गेली आहेत.
    त्र्यंबकेश्‍वर, दिंडोरी, इगतपुरी, पेठ, सुरगाणा या तालुक्यांमध्ये संमिश्र परिस्थिती दिसून येते. रिमझिम पावसावर येथील पिके जिवंत आहेत. श्रावणसरीशिवाय शेतकऱ्यांना दिलासा मिळणार नाही. जिल्ह्यात खरीप हंगामात एकूण सहा लाख 41 हजार 771 हेक्टरवर खरिपाची पेरणी होणे अपेक्षित आहे. त्यापैकी 5 लाख 87 हजार 751 हेक्टरवर (91.58 टक्के) पेरणी झाली आहे. यापैकी बहुतांश ठिकाणची पिके पावसाअभावी करपण्याच्या मार्गावर आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon : फुले कृषी महोत्सव 2026 : केळीच्या ८० वाणांचे थेट प्रात्यक्षिक

    February 3, 2026

    Citrus Fruit Plants : लिंबू वर्गीय फळांची रोपे प्रमाणित असावी : डॉ. एन. के. कृष्णकुमार

    December 23, 2025

    ‘Green Color Day’ : काशिनाथ पलोड पब्लिक स्कुलमध्ये ‘ग्रीन कलर डे’ साजरा

    December 22, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.