Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»आपल्या जगण्यातून इतरांना प्रेरणा देणं हेच खर मनोबल : डॉ.उदय निरगुडकर
    जळगाव

    आपल्या जगण्यातून इतरांना प्रेरणा देणं हेच खर मनोबल : डॉ.उदय निरगुडकर

    SaimatBy SaimatAugust 20, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, जळगाव , प्रतिनिधी
    स्वत:चे आधी आत्मपरिक्षण करा. आपली शक्तीस्थाने, कमजोरी काय आहेत? दोन्ही जाणून घ्या. आपल्याला काय संधी आहेत आणि काय धोखे आहेत हे ही तपासा. त्यानंतर काय करायचे आहे त्याचा विचार करा. कोणकोणत्या गोष्टी टाळाव्या याबाबत डॉ. उदय निरगुडकर म्हणाले, नाऊमेद करणाऱ्या अनेक गोष्टी घडत असतात, पण त्याला बळी पडू नये. निसर्गाने प्रत्येकाला काही गुण दिलेले आहेत. नैराश्याचे शिकार होऊ नका, विफलतेची भावना मनात आणू नका. अयशस्वी झाल्यावर किंवा मागे पडल्यावर पक्षपात, अन्याय झाला – केला गेला, अशी भावना मनात येऊ शकते, अशा भावनांना अजिबात थारा देऊ नका. उलट जिगर दाखवा. यशस्वी व्यक्तीला यश का मिळाले? याचा अभ्यास करा.

    जगातील सर्वोत्तम गोष्टीतून काय घ्यायचे त्याला महत्त्व आहे. तसेच एकाकीपण हा घातक असतो. त्यापासून दूर राहा. आयुष्यात रिलॅक्स व्हायला शिका. तणावमुक्त असल्याशिवाय काही साध्य करता येणार नाही. आयुष्याच्या शेवटच्या क्षणी निराशेच्या गर्तेत गेलेला माणूस सुद्धा बदलू शकतो. आयुष्य फक्त गुलाबाचा प्रवास नाही, आयुष्यात काटे आहे हा निराशावाद आहे, फक्त गुलाब आहे हा आशावाद आहे, पण गुलाबासोबत काटेही आहे हा प्रयत्नवाद आहे. तेव्हा आपण आशावादी अथवा निराशावादी न होता प्रयत्नवादी बना, असा सल्ला दीपस्तंभ फाऊंडेशनच्या सल्लागार मंडळावर असलेले ज्येष्ठ संपादक आणि विचारवंत डॉ.उदय निरगुडकर यांनी मनोबल प्रकल्पातील विद्यार्थ्यांना दिला.

    दीपस्तंभ फाऊंडेशन मनोबल ग्रेट भेट उपक्रमांतर्गत रविवारी ते कुसुंबा येथील प्रकल्पात “Born To Win” या विषयावर जाहीर व्याख्यानात बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर कवयित्री बहिणाबाई चौधरी उमवि व्यवस्थापन समिती सदस्य राजेंद्र नन्नवरे, संचालक डॉ.रुपेश पाटील, नुकतीच मंत्रालयात क्लर्क पदावर नेमणूक झालेली मनोबलची विद्यार्थिनी अनुराधा गेबड आणि यजुर्वेंद्र महाजन उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक यजुर्वेंद्र महाजन यांनी तर सूत्रसंचालन सौरभ बोबटे याने केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Bhusawal:साकरी गावात किरकोळ वादातून तरुणावर जमावाचा हल्ला

    March 24, 2026

    Jalgaon : ‘पाच महत्त्वाच्या कामांवर लक्ष द्या’ – दीपक करंजीकर यांचा नवनिर्वाचित नगरसेवकांना सल्ला

    March 24, 2026

    Jalgaon:जळगावात केटरिंग व्यवसायावर गॅस सिलिंडरचा तुफान फटका

    March 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.