साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
येथील विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश दगडु पाटील यांची सोशल मीडियामधील कामगिरीचा आढावा घेऊन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सोशल मीडिया विभागात राज्य सहसमन्वयक म्हणून नुकतीच नियुक्ती केली आहे.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, भारतीय युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव तथा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सोशल मीडिया विभागाच्या प्रभारी झीनत शबरीन, प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत ओगले यांच्या मार्गदर्शनाखाली “वॉर रूम” महिन्याभरात सुरू करण्यात येणार आहेत. युवक काँग्रेस सोशल मीडियाच्या माध्यमातून केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या चुकीच्या जूलमी धोरणांविरोधात लढा देणार आहे. तसेच सामान्यांपर्यंत सत्य परिस्थिती मांडण्याचे कार्य करणार आहे.
यांनी केले कौतुक
महेश पाटील यांच्या नियुक्तीबद्दल जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पवार, तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, शहराध्यक्ष मनोज पाटील, माजी नगरसेवक तथा अर्बन बँक माजी चेअरमन विद्यमान संचालक प्रविण पाटील, नगरसेवक शाम पाटील, नगरसेविका कमलबाई पाटील यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी कौतुक केले आहे.