Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्रीडा»जामनेरला तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा रंगल्या
    क्रीडा

    जामनेरला तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा रंगल्या

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 19, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, जामनेर : प्रतिनिधी

    येथील ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद आणि जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे १४, १७ व १९ वयोगटासाठी तालुकास्तरीय शालेय शासकीय कुस्ती स्पर्धा शनिवारी, १९ ऑगस्ट रोजी घेण्यात आल्या. स्पर्धेचे उद्‌‍‍घाटन ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालयाचे ज्येष्ठ संचालक ॲड.शिवाजी सोनार यांच्या हस्ते हनुमान प्रतिमेचे पूजन श्रीफळ वाढवून तथा कुस्ती जोड लावून करण्यात आले. स्पर्धेत तालुक्यातून १० वजन गटातून १३४ कुस्तीपटूंनी सहभाग नोंदविला.

    याप्रसंगी ज्ञानगंगा विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र सोनवणे, राज्य कुस्ती पंच दिलीप संगेले(यावल), तालुका क्रीडा संयोजक डॉ.आसिफ खान, दीपक चौधरी, प्रा.समीर घोडेस्वार, वर्षा लोखंडे (शेंदुर्णी) आदी मान्यवर उपस्थित होते.

    यांनी घेतले परिश्रम

    स्पर्धेत प्रमुख पंच म्हणून राज्य कुस्ती पंच दिलीप संगेले तर गुणलेखक डॉ.आसिफ खान, वेळाधिकारी सुनील मोझे यांनी काम पाहिले. यशस्वीतेसाठी व्ही. एन.पाटील, प्रा.समीर घोडेस्वार, आनंद मोरे, दीपक चौधरी, अनिल पाटील, देवा पाटील, जहिर खान, शाहिद शेख, वसीम अहमद,अनिल गायकवाड यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन तथा आभार प्रदर्शन व्ही.एन.पाटील यांनी मानले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Paladhi Taluka Jamner:जळगावचा तरुण चेन्नई समुद्रात बेपत्ता; कुटुंबात शोककळा

    February 23, 2026

    Jalgaon : नैराश्यातून तरुण विद्यार्थ्याची आत्महत्या प्राचार्यांवर गंभीर आरोप

    February 16, 2026

    Jamner : जामनेरमध्ये एकाला चौघांकडून बेदम मारहाण

    February 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.