मलकापुरला महामार्ग चौपदरीकरणाचे केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

0
40

मलकापूर : प्रतिनिधी

“अमरावती ते चिखली” राष्ट्रीय महामार्ग क्र.५३ वरील मलकापूर “नांदुरा-चिखली मुक्ताईनगर अशा ४५ कि.मी. लांबी आणि ८०० रुपये कोटी निधीच्या विकास कामाचे शुक्रवारी, १८ ऑगस्ट रोजी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते मलकापूर येथील गोविंद विष्णू महाजन विद्यालयाच्या प्रांगणावर लोकार्पण करण्यात आले. नांदुरा-चिखली मुक्ताईनगर खंडाच्या चौपदरीकरण प्रकल्पाची लांबी ४५ कि.मी. आहे. याअंतर्गत ६ कि.मी.चा नांदुरा ग्रीनफील्ड बायपास, मलकापूर आरओबी, ४ प्रमुख पूल, १८ छोटे पूल, ११ कल्व्हर्ट, ३ वाहन अंडरपास, ४ पादचारी अंडरपास, ११.५३ कि.मी. दुपदरी सर्व्हिस रोड, २० बस शेल्टर, १ ट्रकले बाई यांचा समावेश आहे. यावेळी खा. रक्षा खडसे यांनी रावेर लोकसभा क्षेत्रातील विविध विकास कामाबाबत निवेदन देऊन निधी उपलब्ध करण्याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मागणी केली आहे.

यावेळी खा.रक्षा खडसे, बुलडाणाचे खा.प्रतापराव जाधव, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आ. चैनसुख संचेती, आ. संजय कुटे, आ. ॲड.आकाश फुंडकर, विधानपरिषदेचे सदस्य आ.वसंत खंडेलवाल, आ.राजेश एकडे, आ.श्वेता महाले, जि.प.च्या माजी अध्यक्षा उमा तायडे, माजी आ.विजयराज शिंदे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश मांटे, रावेर लोकसभा निवडणूक प्रमुख नंदकिशोर महाजन, सुरेश संचेती आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here