रक्तदानाविषयी समाजात जाणीव जागृती करावी : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

0
25

साईमत जळगाव प्रतिनिधी

रक्तदानाचे समाजात महत्त्व वाढले पाहिजे. यामुळे नागरिक स्वतःहून उस्फूर्तपणे रक्तदान करण्यासाठी उत्सुक झाले पाहिजेत. यासाठी समाजात रक्तादानाविषयी जाणीव जागृती करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी तथा रेडक्रास सोसायटीचे अध्यक्ष आयुष प्रसाद यांनी गुरुवारी येथे केल्या.

जळगाव जिल्हा रेडकॉस सोसायटीचे जिल्हाधिकारी श्री.प्रसाद अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला रेडकॉस सोसायटीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, समुपदेशनाच्या गरजा समजून घेण्यासाठी रेड क्रॉस सदस्यांनी तुरुंग अधीक्षकांची भेट घ्यावी. नवीन सदस्यांच्या अर्जांची छाननी करण्यासाठी अध्यक्षासह 6 सदस्यांची समिती स्थापन करण्यात यावी. सोसायटी परिसरात मासिक रक्तदान मोहीम आयोजित करण्यात यावी . नियोजित दिवशी रक्तदान करण्यासाठी विविध संस्थांना प्रवृत्त करावे, असा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.

श्री.प्रसाद म्हणाले, व्हॅन्स, औषधे इत्यादींच्या परिचालन निधीशी संबंधित काही समस्यांचे सूक्ष्म नियोजन करणे आवश्यक आहे. सीएसआर,एचएनआय आणि 80 जी देणग्यांद्वारे विविध उपक्रमांसाठी निधी उपलब्ध करून घेण्यात यावा. डिजिटल रेकॉर्ड आणि डिजिटल डोनर कार्डच्या शक्यता शोधण्यासाठी- सॉफ्टवेअर कंपन्या आणि इतर शाखांशी बोलणी करावीत. सर्व संचालकांनी नेमून दिलेली कामे निर्धारित वेळेत पूर्ण करावीत.असा सूचनाही त्यांनी केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here