स्व.दादासाहेब जे.टी.महाजन यांना जयंतीदिनी अभिवादन

0
16

फैजपूर : प्रतिनिधी

सहकार महर्षी व शिक्षण महर्षी स्व.दादासाहेब जे.टी.महाजन यांना ९९ व्या जयंतीनिमित्त परिसरातील मान्यवरांकडून अभिवादन करण्यात आले. सर्वप्रथम सकाळी त्यांच्या राहत्या घरी न्हावी गावातील विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून त्यांना विनम्र आदरांजली वाहिली. त्यानंतर न्हावी ग्रामपंचायतीच्या सभागृहात शरद महाजन, सरपंच देवेंद्र चोपडे यांच्यासह सर्व ग्रामपंचायतीच्या सदस्यांतर्फे दादासाहेबांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून आदरांजली वाहिली.

जे.टी.महाजन फ्रूट सेल सोसायटीच्या आवारातील अर्धाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून आदरांजली वाहिली. त्यानंतर जे.टी.महाजन कॉलेज ऑफ इंजिनियरिंगच्या आवारातील दादासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास उपस्थित मान्यवरांनी आदरांजली वाहिली.

यांची होती उपस्थिती

यावेळी संस्थाध्यक्ष शरद महाजन, उपाध्यक्ष उल्हास चौधरी, आ. शिरीष चौधरी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, माजी आ. अरुण पाटील, सिनेट सदस्य नरेंद्र नारखेडे, जिल्हा दूध संघाचे संचालक नितीन चौधरी, धनाजी नाना महाविद्यालयाचे चेअरमन लिलाधर चौधरी, हिराभाऊ चौधरी, मार्तंड भिरूड, विजय झोपे, शशिकांत चौधरी, सुभाष भंगाळे, शरद पाटील, भरत चौधरी, भागवत बोरोले, प्रभाकर सरोदे, व्ही.आर.झोपे, विजय परदेशी, डॉ.जी.पी.पाटील, डॉ.व्ही.आर.पाटील, डॉ.आर.एल.चौधरी, डॉ.आर.वाय.चौधरी, विलास चौधरी, हर्षल पाटील, नारायण चौधरी, प्रभाकरआप्पा सोनवणे, पिंटू राणे, राकेश फेगडे, दीपक चौधरी, योगराज बऱ्हाटे, गणेश नेहेते, उमेश फेगडे, नरेंद्र कोल्हे, बाळू फेगडे, राजू महाजन, आरती महाजन, हर्षद महाजन, धनु सर, संदेश महाजन, सचिन इंगळे, पराग वाघुळदे, जयंत बेंडाळे, भगतसिंग पाटील, संजय वाघुळदे, डॉ.आर.डी.पाटील, प्रा.प्रदीप राणे, मोझेस जाधव, नंदकिशोर सोनवणे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख तसेच सर्व संस्थांचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here