Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»‘जय श्रीराम’चा नारा दिल्याने अल्पवयीन मुलाला शिक्षकाने केली मारहाण
    क्राईम

    ‘जय श्रीराम’चा नारा दिल्याने अल्पवयीन मुलाला शिक्षकाने केली मारहाण

    saimatBy saimatAugust 17, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली :

    जय श्रीराम चे नारे दिल्याने अकरावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला त्याच्या शिक्षकांनी मारहाण केली. ही घटना ग्रेटर नोएडा या ठिकाणी एका शाळेत घडली आहे. या प्रकरणी विद्यार्थ्याच्या पालकांनी या प्रकरणी मुख्यमंत्री पोर्टलवर तक्रार केली आहे. अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी हा आरोप केला आहे की पीटी शिक्षकांनी आमच्या मुलाला जय श्रीरामचे नारे दिल्याने मारहाण केली. एवढंच नाही तर आम्ही जेव्हा संचालकांकडे दाद मागायला गेलो तेव्हा त्यांनी तुमच्या मुलाचं नाव महाविद्यालयातून काढून टाकू अशी धमकीही आम्हाला दिली असाही आरोप सदर मुलाच्या पालकांनी केला.

    याबाबत मिळालेली माहिती अशी की शाळेत स्वातंत्र्य दिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ११ वीत शिकणाऱ्या मुलाने जय श्रीरामचे नारे दिले. त्यानंतर शिक्षकांनी त्याला मारहाण केली. सुरुवातीला शिक्षक वर्गात आले त्यांनी या मुलाचं नाव काय आहे ते विचारलं आणि त्यानंतर १५ मिनिटं त्याला बेदम मारहाण केली असा आरोप आहे. या मुलाचे काका त्याला घ्यायला आले होते. त्यावेळी त्याला मारहाण झालेली पाहून त्यांनी कारण विचारलं, त्यावेळी या मुलाने सगळी माहिती दिली.

    या संपूर्ण घटनेविषयी शाळा प्रशासनानेही भाष्य केलं आहे. जे आरोप लावण्यात आले आहेत ते निराधार आहेत असं शाळा प्रशासानाने म्हटलं आहे. त्या दिवशीच्या सगळ्या घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्या आहेत. शाळेची शिस्त विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांनीही मोडली आहे. मात्र आम्ही अद्याप मुलाला शाळेतून काढलेलं नाही. तसंच जे शिक्षक या प्रकरणात आहेत त्यांनी या विद्यार्थ्याला शिकवण्यास नकार दिला आहे. मात्र मारहाणीचे आरोप निराधार आहेत असे शाळा प्रशासनाचं म्हणणं आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Jalgaon, Erandol Taluka:भातखेडा हादरला तरुणाचा धक्कादायक आत्महत्येचा प्रकार उघडकीस

    March 5, 2026

    Jalgaon:जळगावमध्ये ३४ जप्त वाहनांचा जाहीर लिलाव १२ मार्च रोजी तहसील कार्यालयात

    March 5, 2026

    Yaval Sakli : यावल साकळी फाटा कुत्र्यामुळे नियंत्रण सुटले, युवकाचा मृत्यू

    March 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.