Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»गांजाचा नशा करणाऱ्या ८ जणांवर पोलिसांची कारवाई
    क्राईम

    गांजाचा नशा करणाऱ्या ८ जणांवर पोलिसांची कारवाई

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 14, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, भुसावळ : प्रतिनिधी

    शहरात बेकायदेशीर रित्या गांजाचा नशा करणाऱ्या आठ जणांवर भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यात रेल्वेस्थानक परिसरात तीन जणांवर तर शिवदत्त नगरातील सरकारी दवाखान्याजवळ पाच जणांवर कारवाई करून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

    सविस्तर असे की, भुसावळ रेल्वे स्थानक परिसरात आणि शिवदत्त नगरातील सरकारी दवाखान्याचा परिसरात काही तरुण हे बेकायदेशीररित्या गांजाच्या नशा करत असल्याची माहिती भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या शनिवारी, १२ ऑगस्ट रोजी रात्री सव्वा नऊ वाजता बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पथकाने कारवाई केली. त्यात संशयित आरोपी प्रकाश दीपक बाबर (वय २०, रा. गांधीनगर खडका रोड, भुसावळ), अजय सुनील वाघ (वय २०, रा. जुनी पोलीस लाईन, भुसावळ), रवी अशोक तायडे (वय १९, रा. कंडारी, ता.भुसावळ), दानिश युनूस हॉटेल (वय २६, रा. लाल बिल्डिंग जवळ, भुसावळ), शेख आवेश शेख फिरोज (वय २६, रा. मित्तल नगर, भुसावळ), रिजवान बिग अलीम बेग (वय २७, रा.जाम मोहल्ला, भुसावळ), अब्दुल रहमान अब्दुल सलमान रंगरेज (वय २६, रा. जाम मोहल्ला, भुसावळ) आणि उमर मोहम्मद रफिक (वय २८, रा.दत्तनगर, खडका रोड, भुसावळ) अशा आठ जणांना गांजाचा नशा करतांना रंगेहात पकडले. त्यांच्यावर भुसावळ पोलीस ठाण्यात रविवारी, १३ ऑगस्ट रोजी रात्री १ वाजता गुन्हा दाखल केला आहे.

    यांनी केली कारवाई

    ही कारवाई जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक निलेश चौधरी, प्रशांत परदेशी, जितेंद्र पाटील, अन्वर दिलावर शेख, महेश चौधरी, पोलीस नाईक यासीन पिंजारी, तुषार इंगळे, रवींद्र भावसार, निलेश बाबुला, उमाकांत पाटील, भूषण जयंतकर यांनी केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon : अज्ञात वाहनाच्या धडकेत ७० वर्षीय वृद्ध महिलेचा दुदैवी मृत्यू

    March 29, 2026

    Jalgaon : जळगाव एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई तिघे जेरबंद

    March 29, 2026

    Chalisgaon : शिवापूर शिवारात दुहेरी आत्महत्येची दुर्दैवी घटना

    March 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.