साईमत, प्रतिनिधी, जळगाव
‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत हर घर तिरंगा’ अंतर्गत सोमवारी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभागातर्फे राष्ट्रीय ध्वजाचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कुलसचिव डॉ.विनोद पाटील व विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे हे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे महत्त्व, मागील 76 वर्षातील राष्ट्राची झालेली यशस्वी वाटचाल आणि प्रगती तसेच येणाऱ्या काळात देशाच्या सर्वांगीण विकासात विद्यार्थ्यांची भूमिका याबाबत माहिती देण्यात आली. डॉ. तुषार रायसिंग यांनी प्रस्ताविक केले. त्याप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजाचे वाटप करण्यात आले. ‘हर घर तिरंगा ’ हे अभियान स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित केलेली राष्ट्रव्यापी मोहीम आहे.
सदर कार्यक्रमास, कला व मानव्य विद्या प्रशाळेचे प्र. संचालक डॉ. रामचंद्र भावसार, माध्यमशास्त्र प्रशाळेचे संचालक डॉ. सुधीर भटकर, संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभागाचे डॉ. तुषार रायसिंग, डॉ. सुभान जाधव, डॉ. वीणा महाजन व विद्यार्थी हे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शरद पाटील, विलास कुमावत, पंकज शिंपी, कुंदन ठाकरे यांनी परिश्रम घेतले.