Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»रायसोनीत देशभक्तीपर नृत्याविष्काराने विद्यार्थ्यांनी जिंकली उपस्थितांची मने ;
    जळगाव

    रायसोनीत देशभक्तीपर नृत्याविष्काराने विद्यार्थ्यांनी जिंकली उपस्थितांची मने ;

    SaimatBy SaimatAugust 14, 2023Updated:August 14, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, जळगाव, प्रतिनिधी

    येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील डान्स क्लब व म्युझिक क्लबच्या माध्यमातून भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या समारोपानिमित्त ‌‘मेरी मिट्टी मेरा देश‌’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयात देशभक्तीपर गीतगायन आणि देशभक्तीपर नृत्य आदी अनेक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेले विविध जोशपूर्ण देशभक्तीपर गीते तसेच नृत्याचे विलोभनीय व बहारदार सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.

    यामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी साकारलेली तिरंगी वेशभूषा स्पर्धेचे आकर्षण ठरले. सदर उपक्रमावेळी रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, ॲकड्मिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत तसेच भावनगर येथील स्वामी शहानंद कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. हेतल शहा हे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी ‌‘मेरी मिट्टी मेरा देश‌’ या उपक्रमाचे उद्दिष्टे सांगत, भारतात प्रतिभावान युवकांची संख्या सर्वात जास्त आहे. हिच प्रतिभा भारताला सामर्थ्यशाली बनवू शकते, फक्त तरूणांच्या अवलोकन, विश्लेषण आणि परिश्रमातून नवसंकल्पनेला चालना देण्याची गरज आहे.

    पूरक वातावरणातून ते शक्य आहे. माझ्या भारताला शक्तिशाली देश बनविण्यासाठी, देशाचा उत्कर्ष साध्य करण्यासाठी, युवकांनी चौकटीबाहेरचा विचार करून सर्वात आधी देश ही भावना संवेदनशील मनाने स्वीकारली पाहिजे, असे मत प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी यावेळी व्यक्त केले. या प्रसंगी “मिट्टी को नमन विरो को वंदन” या घोषणा देऊन भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी शहिद झालेल्या वीर-वीरांगनांचे स्मरण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या उपक्रमासाठी प्रा. स्वाती पाटील, प्रा. शुभम घोष, प्रा. प्रियंका मुंदडा, प्रा. कविता पाटील यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले तर प्रा. श्रिया कोगटा, प्रा. कल्याणी नेवे, प्रा. योगिता पाटील, प्रा. करिश्मा चौधरी, अक्षय दुसाने व लोकेश साळुंखे यांनी स्पर्धेचे समन्वय साधले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी आणि कर्मचारी उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon : बालविश्व इंग्लिश मीडियममध्ये रामनवमी उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा

    March 25, 2026

    Jalgaon : लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारीचा हप्ता लवकरच लाभार्थींच्या खात्यात जमा होणार

    March 25, 2026

    LPG gas : LPG गॅस बुकिंगचे नियम बदलले OTP व e-KYC अनिवार्य

    March 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.