मनपाच्या इमारतीत हिरकणी कक्षाची उभारणी करावी

0
11

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

जळगाव शहर मनपा इमारतीत हिरकणी कक्ष नसल्याची बाब गेल्या आठवड्यात निधी फाउंडेशनने केलेल्या पाहणीत समोर आले होते. निधी फाउंडेशनच्या अध्यक्षा वैशाली विसपुते यांनी याविषयी महापौर जयश्री महाजन यांची भेट घेऊन नुकतेच निवेदन दिले आहे.

राज्य सरकारने प्रत्येक महत्त्वाचे शासकीय कार्यालय, बस स्थानक, रेल्वे स्थानक आणि वर्दळीच्या कार्यालयात स्तनदा मातांच्या सोयीसाठी हिरकणी कक्षाची उभारणी केली आहे. निधी फाउंडेशनतर्फे गेल्या आठवड्यात पाहणी करण्यात आली. तेव्हा मनपाच्या इमारतीत हिरकणी कक्षच उभारण्यात आला नसल्याचे दिसून आले.

जळगाव शहर मनपात दररोज घरपट्टी, जन्म-मृत्यू दाखला आणि इतर कामानिमित्त कितीतरी महिला येत असतात. मनपा इमारतीत तब्बल १७ मजले आहेत. एखाद्या मजल्यावर लवकरात लवकर हिरकणी कक्षाची उभारणी करावी, अशी विनंती निधी फाउंडेशनच्या अध्यक्षा वैशाली विसपुते यांनी महापौर जयश्री महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
………………………..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here