Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पाचोरा»भडगाव»भडगाव तालुक्यात बिबट्याने घातला धुमाकूळ
    भडगाव

    भडगाव तालुक्यात बिबट्याने घातला धुमाकूळ

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 12, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, भडगाव : प्रतिनिधी

    तालुक्यातील वाडे, बहाळ आणि नावरे शिवारात बिबट्याचा धुमाकूळ सुरू आहे. त्यामुळे वनविभागासह संबंधितांनी त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.

    सविस्तर असे की, भडगाव तालुक्यातील वाडे, बहाळ तसेच नावरे शेतशिवारात मागील सहा महिन्यांपासून बिबट्याचा वावर सुरु आहे. त्या बिबट्याने आतापर्यंत ८ ते ९ वासरांचा फडशा पाडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. १० ऑगस्ट रोजी वाडे गावातील शेतकरी प्रभाकर विठ्ठल पाटील यांच्याही शेतात तारेचे कुंपण तोडून बिबट्याने वासरीचा फडशा पाडला आहे. अशीच घटना ८ दिवसांपूर्वी विकास नारायण पाटील यांच्या शेतातही घडली होती. अशा घटना वारंवार घडत असून वन विभाग काहीच करताना दिसत नाही. आधीच पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. त्यात पशुधनाची हानी होत असेल तर शेतकऱ्यांनी जगावे तरी कसे? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. मुक्या जनावरांवर हल्ला होतोय उद्या उठून माणसांवर हल्ला झाला तर त्याला जबाबदार कोण असेल? असा प्रश्‍नही उपस्थित होऊ लागला आहे.

    …अन्यथा उपोषणाची परवानगी द्या
    वन विभागाने यासंदर्भात तात्काळ दखल घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा, असे आदेश वनविभागाला द्यावे, अन्यथा उपोषणाची परवानगी द्यावी, अशा आशयाच्या मागणीचे निवेदन शेतकरी संघटनेचे अखिलेश पाटील, अक्षय पाटील, भाऊसाहेब माळी, कुलदीप पाटील यांच्यासह शेतकऱ्यांनी भडगावचे तहसीलदार मुकेश हिवाळे यांना दिले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Bhadgaon : भडगावमध्ये साधूवेशातील भामट्यांचा धक्कादायक फसवणूक प्रकार; दाम्पत्याची सोन्याच्या अंगठ्या लंपास

    January 23, 2026

    Bhadgaon:रणा नदीतून वाळू चोरी रोखताना महसूल-पोलिसांवर हल्ला

    December 31, 2025

    Bhadgaon : दर्शन पाटीलची ‘साधनाई गुणवंत्त विद्यार्थी’ पुरस्कारात हॅट्रिक

    December 24, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.