Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»चाळीसगावला गोपालपुरा भागात गांजा विक्रेत्यावर कारवाई
    क्राईम

    चाळीसगावला गोपालपुरा भागात गांजा विक्रेत्यावर कारवाई

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 10, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

    शहरातील गोपालपुरा भागात गांजा विक्री करणाऱ्यांवर शहर पोलिसांनी छापा टाकून ८८ हजार ५७० रूपये किंमतीचा ३ किलो ३१४ ग्रॅम गांजा हस्तगत केला आहे. कारवाईत दोन जणांना ताब्यात घेतले असून इतर दोन जण फरार झाले आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

    सविस्तर असे की, चाळीसगाव शहरातील गोपालपुरा भागात बेकायदेशीर गांजा विक्री होत असल्याची गोपनिय माहिती पोलीस उपअधीक्षक अभयसिंह सूर्यवंशी यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याची पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी, ९ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता गोपालपुरा भागात छापा टाकला. त्यात पोलिसांनी ८८ हजार ५७० रूपये किंमतीचा ३ किलो ३१४ ग्रॅम गांजा हस्तगत केला. याप्रकरणी मांगीलाल मुरलीधर गुजर (वय ५४, रा. गोपालपुरा, चाळीसगाव) आणि नसीमबी अश्रमअली (वय ५५, रा. नागदरोड, झोपडपट्टी, चाळीसगाव) यांना ताब्यात घेतले आहे. तसेच पिंटू पवार आणि साजन लंगड्या (दोन्ही रा.चाळीसगाव) हे दोघे पोलिसांना पाहून पसार झाले आहे. याप्रकरणी पोलीस नाईक दीपक पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

    यांनी केली कारवाई
    ही कारवाई तहसीलदार प्रशांत पाटील, पोलीस निरीक्षक संदीप पाटील तसेच स.पो.नि. विशाल टकले, पो.उप.नि. सुहास आव्हाड, योगेश माळी, पो.ना.विनोद भोई, सुभाष घोडेस्वार, दीपक पाटील, पंढरीनाथ पवार, पो.कॉ. विनोद खैरनार, सुनील निकम, संदीप पाटील, शरद पाटील, प्रवीण जाधव, मोहन सूर्यवंशी, महिला पो.कॉ. सबा फरहीन अ.हकीम शेख, चालक पो.कॉ. विजय महाजन (सर्व. नेम चाळीसगाव शहर पो.स्टे.) तसेच फोटोग्राफर अनिकेत जाधव, वजन मापाडी सागर पाटील, (रा. चाळीसगाव), पंच तुषार पाटील, अलताफ हमीद पिंजारी यांनी संयुक्त अभियान राबवून केली. तपास पी.एस.आय. योगेश माळी, पो.ना.विनोद भोई, पो.कॉ. प्रकाश पाटील करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Pachora: पिंपळगाव हरेश्वरात किरकोळ वादातून तरुणावर बेशुद्ध हल्ला

    February 25, 2026

    Erandol:एरंडोल तालुक्यात हनुमंत खेडेत लग्नसमारंभात हाणामारी

    February 25, 2026

    Jalgaon:अवैध वाळू उपशावर मोठी कारवाई

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.