भारतीय जनता पार्टी मलकापूर तर्फे शहीदांना अभिवादन

0
29

साईमत मलकापूर प्रतिनिधी

क्रांती दिन.. याच दिवशी भारत छोडो आंदोलनाची सुरुवात देशात झाली ह्याचे औचित्य साधून “मेरी मिट्टी मेरा देश””मिट्टी को नमन विरो को वंदन” ह्या कार्यक्रमा अंतर्गत आज दि.९ऑगस्ट बुधवार रोजी मलकापूर येथील शहीद स्मारक येथे आ प्रदेश उपाध्यक्ष चैनसूख संचेती ह्यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता पक्ष मलकापूर तर्फे पुष्पचक्र अर्पण करुण अभिवादन करण्यात आले.

मातृभूमीचे रक्षण करण्याकरता जवान संजयसिंग राजपूत शहीद झाले होते.त्यांच्या स्मारकला पण अभिवादन केल्यानंतर त्यांची वीरपत्नी सुषमा राजपूत सत्कार आपल्या पक्षाच्या महिला आघाडी च्या वतीने करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सामूहिक राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत म्हणण्यात आले.

कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते विजुकाका जाधव, शहर अध्यक्ष मिलिंदजी डवले, जिल्हा चिटणीस शंकरराव पाटील, अमृतकाका बोंबटकर, सुरेशभाऊ संचेती, डॉ योगेश पटणी, विजुभाऊ डागा,अश्विनी काकडे, अर्चनाजी शुक्ला, अश्विनीजी देशमुख, भावनाजी मुंदडा, गीताजी खोडके, प्रमिला इंगळे, खंगार ताई, जाधव ताई , संतोषजी बोंबटकर, शरद मांडविया, मजीदजी राही, विनोदजी अकोटकर, अजीम चौधरी, इकबाल खान, बबलू जमादार, गोपाल पाटील, अजय नांदुरकर, यश संचेती, राहुल देशमुख, विशाल मदवानी, अमित चौबे, चंद्रकांत वर्मा समवेत अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ योगेश पटणी ह्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here