Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»फैजपूर»श्री लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेने केला गुणवंताचा गौरव
    फैजपूर

    श्री लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेने केला गुणवंताचा गौरव

    SaimatBy SaimatAugust 9, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत फैजपूर प्रतिनिधी

    विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत भाग घेऊन प्राविण्य मिळवावे व प्रशासकीय अधिकारी बनावे असे आवाहन फैजपूर प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी फैजपूर शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करताना आवाहन केले. या कार्यक्रमाचे आयोजन श्री लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था यांनी केले होते.

    या कार्यक्रमाचे अध्यक्ष पतसंस्थेचे चेअरमन नरेन्द्र नारखेडे होते तर प्रमुख पाहुणे माजी आ. अरुण पाटील, मसाका माजी चेअरमन शरद महाजन, फैजपूरचे ए पी आय निलेश वाघ, वरिष्ठ वन अधिकारी मुकेश महाजन, होमगार्ड माजी जिल्हा समादेशक पंडितराव कोल्हे यांची उपस्थित होते.

    या मान्यवरांचे हस्ते गुणवन्त विध्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. श्री लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांना 12 टक्के लाभांश देण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. संस्थेने गतकाळात केलेल्या सामाजिक उपक्रमाबाबत संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांनी आढावा सादर केला.
    यापुढे संस्थे तर्फे सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून सेवा सुरू राहील. गरीब निराधार विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावर्षी संस्थेला सर्व प्रकारच्या तरतुदी करून 13 लाख नफा असून संस्थेचा लवकरच रौप्य महोत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे सुद्धा चेअरमन नरेंद नारखेडे यांनी जाहीर केले.
    कार्यक्रमात संचालक प्राचार्य रवींद्र चौधरी, डॉ. गणेश चौधरी, निळकंठ सराफ, अप्पा चौधरी, अनिलशेठ नारखेडे, चंद्रशेखर माहुरकर, विजय परदेशी, सुरेश परदेशी, खेमचंद्र नेहते, संचालिका रेवती चोलदास पाटील, लतिका भास्कर बोंडे, कमलाकर भंगाळे, चोलदास पाटील, राजेंद्र भावडू महाजन, मिलिंद नेहते, पुंडलिक पाटील, नितीन फिरके, भास्कर बोन्डे, दूध संघ संचालक नितीन सर, आर. पी. झोपे सर, डॉ. बी. एन. नारखेडे, डॉ. ए. के. जावळे, काशिनाथ वारके यासह विद्यार्थी पालक मोठया संख्येने उपस्थित होते. आभार व्हा. चेअरमन मनोजकुमार पाटील यांनी मानले तर सूत्र संचालन व्यवस्थापक जयश्री चौधरी यांनी केले. राजेंद्र मानेकर, महेंद्र वायकोळे, राजू मिस्त्री, चंद्रकांत पाटील, शेखर चौधरी, भूषण नारखेडे यांनी परिश्रम घेतले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Faizpur : अकलूद शिवारात भव्य शिवमहापुराण कथा

    March 1, 2026

    Jalgaon : पत्रकारांना कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वेगावर स्वार होणे गरजेचे-डॉ. सदानंद मोरे

    January 6, 2026

    Faizpur:दामिनी सराफ यांनी फैजपूर नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला

    January 1, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.