साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
‘तहजीब उर्दु शाळेतील विद्यार्थ्यांचा चिखलातून प्रवास’ अशा ठळक मथळ्याखाली दैनिक ‘साईमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. याबाबत प्रशासकासह माजी नगरसेवकांबद्दल नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत होता. त्याची नगरपालिकाने दखल घेत तहजीब नॅशनल उर्दु शाळेच्या रस्त्यावर मुरूम टाकला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा चिखलातून प्रवासापासून होणारा त्रास दूर केला आहे. तसेच वार्ड क्रमांक १४ व १५ मधील मदनी नगरसह अनेक भागाच्या रस्त्यावर नगरपालिकाने मुरूम टाकला.
याकामी सामाजिक कार्यकर्ते सलमान खान, आदिल चाऊस, वसीम शेख यांनी पाठपुरावा केला. याबद्दल नागरिकांनी दैनिक ‘साईमत’सह सलमान खान, आदिल चाऊस आणि वसीम शेख, मित्र मंडळ यांचे आभार मानले आहे.