Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»प्रगती विद्यामंदिर शाळेत रंगली ‘श्रावण सरी’ समूह गीत गायन स्पर्धा
    जळगाव

    प्रगती विद्यामंदिर शाळेत रंगली ‘श्रावण सरी’ समूह गीत गायन स्पर्धा

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 8, 2023Updated:August 8, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत,  जळगाव : प्रतिनिधी

    श्रावण महिन्याला सुरुवात झाली आणि श्रावण सरी बरसल्या. अशाच सरींना टिपण्यासाठी प्रगती विद्यामंदिर शाळेत ‘श्रावण सरी’ समूह गीत गायन स्पर्धा रंगली. विद्यार्थ्यांना श्रावणाचे महत्व आणि या श्रावण महिन्यात कोणकोणते विशेष सण येतात, त्याचे ज्ञान व्हावे, या उद्देशाने पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांची स्पर्धा घेण्यात आली. त्यात “आला आला श्रावण”, “श्रावण मासी हर्ष मानसी” अशा गीतांचा समावेश होता. यामुळे श्रावण महिन्यावरील आधारित गाण्यांची पर्वणी उपस्थितांना मिळाली.

    विद्यार्थ्यांना शिक्षण देतांना नवनवीन पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे असते. या दृष्टिकोनातून प्रगती विद्यामंदिर शाळेत नवनवीन शैक्षणिक उपक्रम व स्पर्धाचे आयोजन करण्यात येते. अशा नावीन्यपूर्ण स्पर्धेचे कौतुक करताना विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रेमचंद ओसवाल यांनी शिक्षण देतांना शिक्षण पद्धतीत आमुलाग्र बदल घडविण अपेक्षित असते, असे मत व्यक्त केले. अध्यक्षा मंगला दुनाखे यांनी ‘श्रावण सरी’ समूह गीत गायन स्पर्धेमुळे विविध श्रावण महिन्यावर आधारित गाणी ऐकायला मिळाली, असे व्यक्त केले. तसेच सचिव सचिन दुनाखे यांनी स्पर्धेचे कौतुक केले.

    स्पर्धेचे परीक्षक म्हणून संध्या कोळपकर, सुवर्णा पाटील यांनी काम पाहिले. सूत्रसंचलन शिक्षक मनोज भालेराव, नेहा क्षीरसागर तर रत्नप्रभा पवार यांनी आभार मानले. याप्रसंगी मुख्याध्यापिका संगीता गोहील, मनीषा पाटील, ज्योती कुलकर्णी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:जळगाव महापालिकेत स्थायी समिती व महिला बालकल्याण समिती सभापती निवडीची अंतिम तयारी

    February 25, 2026

    Jalgaon : महापौरांचा आवाहन स्थानिक महिला बचत गटांना खरेदीद्वारे पाठबळ द्या!

    February 25, 2026

    Jalgaon: जळगाव जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प मंजूर; ५० कोटी ९७ लाखांचा विकासाचा दृष्टिकोन

    February 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.