Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»धुळे»‘आस्था‌’ संस्थेची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ‌चौकशी
    धुळे

    ‘आस्था‌’ संस्थेची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ‌चौकशी

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 8, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, धुळे । प्रतिनिधी

    महानगरपालिकेला विविध कामांसाठी कामगार पुरविणाऱ्या ‌‘आस्था‌’ संस्थेच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी महापौर प्रतिभा चौधरी यांनी केलेल्या तक्रारीवर आता विभागीय आयुक्त कार्यालयाने याप्रकरणी आवश्यक कार्यवाही/चौकशी करावी, असे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. त्यामुळे आता या प्रकरणाकडे लक्ष लागून आहे.

    महापौरांची तक्रार अशी, धुळे महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना आरोग्य, पाणीपुरवठा तसेच इतर कामासाठी मनुष्यबळ (कामगार) पुरविण्याचे काम ‌‘आस्था‌’ स्वयंरोजगार संस्थेला २०१९ मध्ये देण्यात आले. त्यानुसार एकूण २६३ कर्मचाऱ्यांचा मोबदला मनपातर्फे आस्था संस्थेला वेळोवेळी देण्यात आला. दरम्यान, नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठी शासनाकडून प्राप्त निधीचा योग्य वापर होत आहे अथवा कसे याबाबत महापौर श्रीमती चौधरी यांनी चौकशी केली. प्रशासनाशी पत्रव्यवहार केला. कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यात प्रशासन व ‌‘आस्था‌’ संस्थेने धुळे महानगरपालिकेच्या निधीचा गैरव्यवहार केल्याचे उघड झाले. कर्मचाऱ्यांच्या नावात, संख्येत बदल, करारनाम्यातील अटी-शर्तींचा भंग झाल्याचे दिसून आले. कर्मचाऱ्यांच्या बायोमेट्रिक हजेरीबाबतही आरोग्य विभाग व प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नसल्याची बाब समोर आली.

    ‌‘आस्था‌’ संस्थेसोबत एक वर्षाचा करार संपल्यानंतर करार वाढविण्याबाबत प्रशासनाने कार्यवाही केली नाही.बेकायदेशीरपणे लाखो रुपयांची बिले संस्थेला अदा केली. कर्मचारी हजर नसताना त्यांचे वेतन काढले गेले. कर्मचाऱ्यांच्या ओळखपरेडदरम्यान ९४ कर्मचारी गैरहजर आढळले. कर्मचाऱ्यांचे बँक खाते, विमा, पीएफ आदींबाबतही पूर्तता झालेली नाही. आस्था संस्थेची कार्यक्षमता मर्यादा रक्कम ३० लाख रुपये असताना या मर्यादेपेक्षा जास्त व्यवहार केला गेला आदी विविध मुद्दे महापौर श्रीमती चौधरी यांनी तक्रारीत मांडले होते. या तक्रारीच्या अनुषंगाने ‌‘आस्था‌’ संस्थेला सहाय्य करणाऱ्या मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांवर तत्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत आयुक्तांना पत्र दिले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Dhule : धुळ्यातील पिंपळनेर हादरले; आनंदोत्सवात धारदार शस्त्रांचा कहर

    February 20, 2026

    Taloda:क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त तळोदा महाविद्यालयात अभिवादन

    January 3, 2026

    Navapur:“नवापूर नगराध्यक्षांचे दालन नागरिकांसाठी सदैव खुले; नवापूरमध्ये लोकशाही संवादाला नवे बळ”

    January 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.