Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्रीडा»जामनेरला तालुकास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत इंदिराबाई ललवाणी ठरले विजयी
    क्रीडा

    जामनेरला तालुकास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत इंदिराबाई ललवाणी ठरले विजयी

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 7, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, जामनेर : प्रतिनिधी

    पुणे येथील क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा परिषद आणि जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे १४, १७, १९ मुले, मुली वयोगटासाठी लॉर्ड गणेशा स्कूल येथे सोमवारी, ७ ऑगस्ट रोजी तालुकास्तरीय शालेय शासकीय फुटबॉल स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात १४, १७ वर्ष मुले व मुली गटात लॉर्ड गणेशा स्कूल अव्वल तर १९ वर्ष मुले व मुली गटात इंदिराबाई ललवाणी माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालय विजयी ठरले आहे. स्पर्धेत १२ संघांनी सहभाग नोंदविला होता.

    स्पर्धेचे उद्‌‍‍घाटन शिक्षण विस्तार अधिकारी विजय सरोदे, लॉर्ड गणेशा स्कूल संस्थेचे सचिव अभय बोहरा, प्रशासकीय अधिकारी सतीश मोरे यांच्या हस्ते मैदानाचे पूजन व श्रीफळ वाढवून करण्यात आले. याप्रसंगी तालुका क्रीडा संयोजक डॉ.आसिफ खान, अंजुमन उर्दू हायस्कूल उपमुख्याध्यापक शेख जलाल, पेत्रस शिरसाठ, वसीम अहमद, झहीर खान यांच्यासह शाळेतील क्रीडा शिक्षकांची उपस्थिती होती.

    स्पर्धेचे सूत्रसंचालन प्रा.समीर घोडेस्वार यांनी केले. स्पर्धेसाठी मुख्य पंच डॉ. आसिफ खान, पंकज तिवारी, शेख मोहसीन, अबरार जुबेरी यांनी पंच म्हणून काम पाहिले. तालुका स्पर्धा समिती प्रमुख नरेंद्र पाटील, आनंद मोरे, अमोल भालेराव यांनी परिश्रम घेतले. विजयी खेळाडूंचे शिक्षण विस्तार अधिकारी विजय सरोदे, लॉर्ड गणेशा स्कूल संस्थेचे सचिव अभय बोहरा, प्रशासकीय अधिकारी सतीश मोरे, डॉ.आसिफ खान, नरेंद्र पाटील, आनंद मोरे, प्रा.समीर घोडेस्वार यांनी कौतुक केले आहे.

    स्पर्धेचा निकाल असा
    १४ वर्ष मुले – विजयी- लॉर्ड गणेशा इंग्लिश स्कूल, उपविजयी- अंजुमन हायस्कूल, १४ वर्ष मुली- विजयी – लॉर्ड गणेशा इंग्लिश स्कूल, १७ वर्ष मुले- विजयी – लॉर्ड गणेशा इंग्लिश स्कूल, उपविजयी – अंजुमन हायस्कूल, १७ वर्ष मुली – विजयी – लॉर्ड गणेशा इंग्लिश स्कूल, १९ वर्ष मुले – विजयी – इंदिराबाई ललवाणी माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय, १९ वर्ष मुली- विजयी – इंदिराबाई ललवाणी माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय.

     

     

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Paladhi Taluka Jamner:जळगावचा तरुण चेन्नई समुद्रात बेपत्ता; कुटुंबात शोककळा

    February 23, 2026

    Jalgaon : नैराश्यातून तरुण विद्यार्थ्याची आत्महत्या प्राचार्यांवर गंभीर आरोप

    February 16, 2026

    Jamner : जामनेरमध्ये एकाला चौघांकडून बेदम मारहाण

    February 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.