Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक दोघांविरुध्द गुन्हा दाखल
    क्राईम

    नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक दोघांविरुध्द गुन्हा दाखल

    SaimatBy SaimatAugust 7, 2023No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत मलकापूर प्रतिनिधी

    नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी मलकापूर शहर पोलीस स्टेशनला दोघांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत सविस्तर असे की, रतन उर्फ गंगाराम जगन्नाथ दाभाळकर वय ४५ वर्ष व्यवसाय-पानपटी दुकान रा. एकता नगर यांनी मलकापूर शहर पोलीस स्टेशनला येवुन तक्रार दाखल केली की, माझा लहान भाऊ रमन दाभोळकर यांचे १२ वी नापास पर्यंत शिक्षण झाले असून माझी १९९४ पासून रेल्वे स्टेशन जवळ, पानपट्टीचे दुकान आहे. अजय प्रभाकर सावळे रा. आंबेडकरनगर, मलकापुर यास मी पूर्वी पासून ओळखतो. आशिष सुभाष हाताळकर व आम्ही एकतानगर मलकापूर येथे राहत असुन माझा लहान भाऊ रमन दाभाळकर व आशिष हाताळकर यांचे सोबत शिक्षण झाले आहे. एका दिवशी मी माझे पानपटटीवर असतांना अजय प्रभाकर सावळे आशिष हातळकर माझे पानपट्टीवर आले त्यांनी मला सांगितले की इलेक्ट्रीक बोर्डामध्ये चपराशीच्या जागा निघाल्या आहे तुला तुझ्या भावाचे भविष्य बनवायचे आहे का ? त्याला नोकरीला लावायची आहे का ? आम्ही तुझे भावाला इलेक्ट्रिक बोर्डमध्ये चपराशीच्या जागेवर लावून देवु शकतो. परंतु तुला तर माहिती आहे पैश्याशिवाय कोणतेही काम होत नाही, खर्च करायची तयारी असेल तर तुझे काम करून देतो त्यामुळे भावाच्या भविष्याचा विचाराने भावनिक झालो त्यांना विचारले की नोकरीला लावण्यासाठी किती पैसे दयावे लागतील, त्यांनी सांगितले की १,३००००/- रुपये तुला दयावे लागतील. त्यानंतर मी त्यांना सांगितले की दोन तीन दिवसांनी तुम्हाला सांगतो त्यानंतर अजय सावळे व आशिष हाताळकर यांनी नेहमी नेहमी दुकानावर येवून काय ठरविले बाबत विचारणा केली असता मी त्यांना सांगितले की जुळवाजुळव झाली की, मी तुम्हाला देतो. त्यानंतर मी पैसे जमविले व त्यांना दि. १५/१०/२०२१ रोजी दुपारी माझे पानपटटीवर माझ्या परिचयाचे कुणाल सुधीरराव सावळे रा. भिमनगर, मलकापुर यांना बोलावुन सांगितले की, अजय प्रभाकर सावळे व आशिष सुभाष हाताळकर हे माझे लहान भावाला इलेक्ट्रीक बोर्डामध्ये चपराशी पदावर नोकरीला लावून देत आहे माझे भावाला नोकरीला लावण्यासाठी त्यानी मला १,३००००/- रुपये मागितले आहेत, तुमचे समोर यांना पैसे द्यायचे आहेत. त्यावर कुणाल सावळे यांनी संमती दर्शविली. थोड्या वेळाने अजय सावळे व आशिष हाताळकर तेथे आले. ठरल्याप्रमाणे मी त्यांना कुणाल सावळे यांचेसमक्ष १,३००००/- रूपये दिले नंतर त्यांनी मला सांगितले की, तुझे काम होऊन जाईल, असे सांगुन निघुन गेले पैसे दिल्यावर तीनचार महिन्यानंतर सुध्दा माझे भावाला नोकरी न लागल्याने मी अजय प्रभाकर सावळे व आशिष सुभाष हाताळकर यांना वेळोवेळी समक्ष भेटुन व फोनद्वारे त्याचसोबत संपर्क करून माझे पैसे परत मागितले, त्यानंतर त्यांनी मला समक्ष भेट्न व फोनव्दारे उडवाउडवीचे उत्तरे देवून पैसे देण्यास टाळाटाळ केली. अजय प्रभाकर सावळे व आशिष सुभाष हाताळकर हे माझे घेतलेले पैसे परत करणार नाही असे सांगितले वरून माझे लक्षात आलं की, अजय प्रभाकर सावळे व आशिष हाताळकर माझे लहान भावाला नोकरीला लावुन देण्याचे आश्वासन देत पैश्याच्या १,३००००/- रुपये घेवुन माझे भावाला नोकरीला लावलं नाही. व जाइनिंग ऑर्डर दिली नाही तसेच माझे पैसे सुध्दा परत दिले नाही करीता अजय प्रभाकर सावळे व आशिष सुभाष हाताळकर यांनी माझी फसवणूक केली. त्याचेवर कायदेशिर कार्यवाही व्हावी.अशा प्रकारे तक्रार दाखल केल्याने या दोघा विरुद्ध भा. द. वि. कलम ४२० सह ३४ प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jamner: जामनेर शहरात घरफोडीची घटना; शिक्षक कॉलनीत खळबळ

    March 7, 2026

    Malegaon:मालेगाव मार्गावर भीषण अपघात सातोड कुटुंबाचा अपघातात जागीच मृत्यू

    March 6, 2026

    Yaval: हंबर्डी गावात विवाहित तरुणाची आत्महत्या; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

    March 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.