साईमत, पुणे ः प्रतिनिधी
येथील ५७ व्या वरिष्ठ राज्य कॅरम स्पर्धेत महिला गटात पुणे तर पुरुष गटात मुंबई संघास विजेतेपद मिळाले.इतिहासात पुणे येथे प्रथमच स्पर्धा झाल्या व पुणे महिला संघाने विजेतेपद पटकाल्याने पुणेकरांच्यादृष्टीने ही अनोखी भेट ठरली.सांघिक गटात साखळी सामन्यांमध्ये पुणे व मुंबईचे प्रत्येकी ८ सामने झाले होते त्यामुळे कोण बाजी मारणार,याबाबतची उत्सुकता शिगेला पोहचली होती.अंतिम सामन्यात पुणे संघाने बाजी मारली.पुणे संघाने मुंबईला २-१ असे नमवून पहिल्यांदाच विजेतेपदाचा बहुमान मिळवला.
मुंबईच्या काजल कुमारीने पहिल्या एकेरीच्या सामन्यात पुण्याच्या तुलिका चौरसियाला २०-०,१९-१६ असे हरवून आपल्याला संघाला आघाडी मिळवून दिली होती परंतु दुसऱ्या एकेरीच्या सामन्यात पुण्याच्या मेधा मठकरीने मुंबईच्या अंबिका हरियवर १४-१३, २५-१३ असे अनपेक्षित सरळ दोन सेटमध्ये सामना बरोबरीत आणून रंगत वाढवली. दुहेरीच्या तिसऱ्या सामन्यात पुण्याच्या पुष्कर्णी भट्टड व श्रुती वेळेकर या ज़ोडीनेे मुंबईच्या संगीता चांदोरक व मिताली पाठक जोडीवर १९-११ व १४-७ असा विजय नोंदवून पुण्याच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. पुरुषांच्या सांघिक गटात मुंबई संघाने बाजी मारली.