Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»तलवारीने केक कापणे पडले चांगलेच महागात ! पोलिसात गुन्हा दाखल!
    क्राईम

    तलवारीने केक कापणे पडले चांगलेच महागात ! पोलिसात गुन्हा दाखल!

    SaimatBy SaimatJune 24, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    तलवारीने केक कापणे पडले चांगलेच महागात ! पोलिसात गुन्हा दाखल!
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत चोपडा प्रतिनिधी

    शहरातील मास्टर कॉलनी भागात सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर वाढदिवसाचा तलवारीने केक कापल्याप्रकरणी आठ तरुणांवर चोपडा शहर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांपैकी सात जणांना अटक करण्यात आली आहे.

    याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक 22 रोजी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास शहरातील मास्टर कॉलनी परिसरात विना परवाना धारदार लोखंडी तलवार तसेच चाकु जवळ बाळगून सार्वजनिक ठिकाणी रोडवर वाढदिवसाचा केक कापण्याकरीता वापर करतांना आढळून आल्याने तसेच जिल्हाधिकारी यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी १) सैय्यद फैजलअली मझहरअली व २) रिजवानअली अयाजअली दोघेही रा. शेतपुरा; ३)शाकीर सैय्यद साबीरअली, ४) दानिश सय्यद साबीरअली, व ५)दानिश शेख हमीद शेख तिघेही रा. मास्टर कॉलनी; ६)बाबू लोहार निजाम लोहार रा. केजीएन कॉलनी ७)साजिद शेख गफ्फार रा. चुनारअळी व ८) शोएब शाह जाकीर शाह रा. फकीरवाडा या आठ जणांविरोधात चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे सीसीटिएनएस गुरनं. 333/2023 अन्वये भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 सह (37) (1) (3) चे उल्लंघन 135, भादंवी कलम 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी सात जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे .

    सदर कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरिक्षक के.के. पाटील यांच्या नेतृत्वाखाली सपोनि. अजित सावळे, संतोष चव्हाण, पोहेकाँ. विलेश सोनवणे, शेषराव तोरे, वेलचंद पवार, पोना. संतोष पारधी, ज्ञानेश्वर जवागे, संदिप भोई आदिंनी केली. सदर गुन्ह्याचा तपास पोना. संदीप भोई हे करीत आहेत.

     

     

    #chopda #crime
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Bhusawal : नवोदय विद्यालयाजवळील विहिरीत अनोळखी मृतदेह भुसावळात खळबळ

    April 5, 2026

    ​​Jalgaon : जळगावात मध्यवर्ती भागात घरफोडी; बंद घर फोडून ५७ हजारांचा ऐवज लंपास

    April 5, 2026

    Jalgaon : जळगाव-भुसावळ महामार्गावर भीषण अपघात

    April 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.