साईमत लाईव्ह ओझर प्रतिनिधी
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने मातोश्री शेत/पाणंद रस्ते ही योजना तयार करण्यात आलेली आहे परंतु ही योजना प्रत्यक्षात काही अटी अडसर ठरत आहे या जाचक अटी मुळे सदर योजनेचा फायदा शेतकऱ्यांना होत नसल्याने या योजनेत येणाऱ्या जाचक अटी रद्द कराव्या अशी मागणी निफाड तालुक्यातील दिक्षी ग्रामपंचायतीचे विध्यमान सरपंच डॉ योगेश्वर चौधरी यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे ई-मेल द्वारे निवेदन पाठवत केली.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ग्रामीण भागात अनेक शेतकरी हे शेतात वास्तव्यत आहे तसेच आपला शेतीमाल मुख्य रस्त्यावर आणण्यासाठी आपल्या शिवारातील रस्ताचा वापर करावा लागतो परंतु सद्यस्थितीत या शिवार रस्त्याची अवस्था अतिशय दैनिय झाली आहे . शेतकऱ्यांना आपला शेतात पिकवलेला भाजीपाला, कांदा, द्राक्ष ,टमोटो बाजारपेठेत नेताना प्रचंड अडचणीचा सामना करावा लागतो ,सदर शिवार रस्ते इतर योजनेतुन करताना लोकप्रतिनिधीना अडचणी येतात म्हणून महाराष्ट्र शासनाच्या वतीने मातोश्री शेत पाणंद योजना कार्यान्वित करण्यात आली परंतु शासनाचा मुख्य उद्देश मनरेगा हा प्रमुख अडथळा ठरत आहे.
नियमानुसार मातोश्री शेत पाणंद रस्त्याचे काम सुरू असताना सकाळ सायंकाळ एसएमएस प्रणाली द्वारे मजुराची संख्या शंभर टक्के उपस्थिती यशस्वी होणे शक्य नाही ,कारण बहुदा ठिकाणी मोबाईल नेटवर्क नसते,तसेच शासनाने ठरवून दिलेल्या २५८रुपये ह्या हजेरीने कोणीही काम करण्यास तयार नाही कारण दुसरीकडे ४००ते ५०० पर्यंत रोज मिळतो..सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे राज्यातील बहुतांश भागातील शेतकरी आज परराज्यातील कामगारांकडून आपल्या शेतीचे कामे करून घेतता असे असताना पाणंद रस्त्यावर काम करण्यास मजुर कसे मिळतील ही बाब प्रकर्षांने लक्षात घेणे गरजेचे आहे.
मनरेगाच्या जाचक अटी मुळे शेतकऱ्यांच्या दृष्टिने अत्यंत महत्वकांक्षी असलेकी योजना आज मितीस ठप्प पडलेली आहे त्यामुळे ज्या प्रकारे शरीरामध्ये अंतर्गत रस्त्यासाठी .ग्रामविकास विभागामार्फत गावातील अंतर्गत रस्ते ,सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत राज्यमार्गासाठी व प्रमुख जिल्हा मार्ग या रस्त्यासाठी जसा थेट निधी मंजूर करण्यात येतो तसा आमच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतात जाणाऱ्या रस्त्याना थेट निधी उपलब्ध करून दयावा जेणेकरून शेतकऱ्यांना आपला शेतीमाल बाजारपेठेत आणणे सोपे होईल .नुकत्याच सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा विषय मार्गी लावावा मागणी दिक्षी ग्रामपंचायत सरपंच डॉ योगेश्वर चौधरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ई-मेल द्वारे निवेदन पाठवत केली.