साईमत लाईव्ह जळगांव प्रतिनिधी
भारत सरकार संचालित युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा केंद्र जळगांव यांचा वतीने मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशन, जळगांव या संस्थेस “जिल्हास्तरीय उत्कृष्ट युवा मंडळ पुरस्कार-२०२०,२१ पुरस्काराने गौरविण्यात आले.
संस्थेने सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा पर्यावरण व युवा कल्याण साठी केलेल्या कार्याची दखल घेत या पुरस्काराने गौरविण्यात आले.
क.बहिणाबाई चौधरी उ.म.वि. या ठिकाणी संविधान जनजागृती कार्यक्रमात कवयित्री बहिणाबाई चौधरी.उ.म.वी.चे कुलगुरू श्री.एस.टी.इंगळे सर, सत्र न्यायाधीश श्रीमती एस.ए.कुलकर्णी मॅडम यांचा हस्ते संस्थेच्या युवा अध्यक्षा रोशनी शेख व संस्थापक अध्यक्ष फिरोज शेख यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी(उमवी)चे कुलगुरू एस.टी.इंगळे सर, सत्र न्यायाधीश श्रीमती एस. ए. कुलकर्णी मॅडम,प्रा. अजय पाटील सर, प्रा.मैथु, नेहरू युवा केंद्रचे अधिकारी नरेंद्र डागर,सरकारी वकील अँड.स्वाती निकम,अँड. बडगुजर, अजिंक्य गवडी आदींच्या उपस्थिती सन्मानित करण्यात आले.