Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»निंभोरा पोलीस स्थानकाच्या हद्दीत अवैध धंद्यांना अधिकृत परवानगी?
    क्राईम

    निंभोरा पोलीस स्थानकाच्या हद्दीत अवैध धंद्यांना अधिकृत परवानगी?

    SaimatBy SaimatOctober 7, 2022Updated:October 7, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत लाईव्ह निंभोरा ता. रावेर प्रतिनिधी

    निंभोरा पोलिस ठाण्यांतर्गत २९ गावांचा समावेश आहे. या परिसरात अवैध दारुविक्री व वाहतूक, मटका, गांजाविक्री, जुगार, अवैध वाळूवाहतुक व इतर अवैध धंदे पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत खुलेआम पोलिसांच्या नजरेखाली सुरु आहेत. या अवैध धंद्यांवर सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश लावणार, की सुरु ठेवणार? किंवा यापैकी कोणते धोरण अवलंबितात याकडे सर्व नागरीकांचे लक्ष लागले आहे.

    घाम न गाळता सर्वांना हवाय मेवा
    सध्या निंभोरा पोलीस स्थानकाच्या हद्दीत अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ही परिस्थिती अनेकांचे संसार उधवस्त करीत आहेत. परंतू ‘घाम न गाळता सर्वांना हवाय मेवा’. यामुळे तरुण पिढी या अवैध धंद्यात गुंतली असून मटका, जुगार, दारु, गांजासारख्या अंमली पदार्थांचे व्यसन तरुण, वयोवृद्धांसह लहान लहान मुलांना लागले आहे. अगदी व्यसनाकरीता ते काहीही करायला तयार होतात. यामुळे ते स्वत: व आपल्या कुटुंबाला संकटाच्या दारात उभे करीत आहेत.

    अवैध धंद्यांवर कारवाई होणार की सुरूच राहणार ?
    अनेक शेत जुगारांचे मोठमोठे अड्डे बनलेले आहेत. पोलिसांनी जर मनावर घेतले की अवैध धंदे कुणी करणार नाही , तर परिसरात एकही अवैध धंदे करणारा आढळून येणार नाही. निंभोरा पोलिस ठाण्याचे गणेश धुमाळ हे परीसरातील सुरु असलेले अवैध धंदे सुरु ठेवणार की यावर कारवाही करणार किंवा यापैकी कोणते धोरण अवलंबिणार, हा प्रश्‍न पुढील काळात दिसून येईल.
    पैसे मिळविण्याच्या हव्यासात पूर्ण नुकसान
    मटक्यात ओपन व क्‍लोज याप्रमाणे आकडे लावले जातात. ओपनमध्ये आकडा लागला तर लालसेपोटी आलेले पैसे परत क्‍लोज आकड्यात लावले जातात. परंतु, क्‍लोजमध्ये आकडा न लागल्याने मिळालेल्या रकमेलाही मुकावे लागते. तसेच व्यसनाधीनता वाढते. कमी अवधीत जास्त पैसे मिळवण्याच्या हव्यासात पूर्ण नुकसान होत आहे. त्यामुळे मटका बंद करावा, अशी मागणी नागरिक करत आहे.

    एक तासाचे स्टिंग ऑपरेशन
    निंभोरा पोलिस ठाण्यांतर्गत २९ गावांचा समावेश आहे. या गावात सुरु असलेल्या अवैध धंद्यांचे जवळपास एका तासाचे स्टिंग ऑपरेशन करण्यात आले आहे. यात अनेक गंभीर गोष्टी समोर आल्या आहेत. यातील व्हिडीओ बघितले तर निंभोरा पोलीस स्थानकाच्या हद्दीत अवैध धंद्यांना अधिकृत परवानगी आहे का?, असा प्रश्न पडतो.

    विवरे येथे बनावट देशी दारूची सर्रास विक्री !
    निभोरा परिसरातील विवरे येथे बनावट देशी दारूची सर्रास विक्री सुरु आहे, अगदी बेकायदेशीरपणे दारु पाजणाऱ्या अड्ड्यांची संख्या देशी दारूच्या दुकानांपेक्षा खूप अधिक आहे. विश्‍वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विवरे येथे बनावट देशी दारूची सर्रास विक्रीच्या मागे मोठे रॅकेट असून विवऱ्यातील देशी दारूचे दुकान मध्य रात्रीपर्यंत सुरु राहते. तर येथूनच परिसरातील गावांमध्ये देशी दारू मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी जाते. यातून मोठी आर्थिक उलाढाल होत असून यातील एक मोठा हिस्सा पोलिसांना दिली जात असल्याचा आरोप आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Chalisgaon : चाळीसगाव तालुक्यातील पोलीस कर्मचाऱ्याने संपविले जीवन

    March 9, 2026

    Amalner : भरधाव दुचाकीची भीषण धडक विटनेर येथील ४८ वर्षीय प्रौढाचा मृत्यू

    March 9, 2026

    Bhadgaon : भडगावात मुलांना वाचवताना दोन तरुणांचा गिरणा नदीत बुडून मृत्यू

    March 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.