साईमत लाईव्ह पहुर ता.जामनेर प्रतिनिधी
येथील खंडेराव नगरात दोन ठिकाणी घरफोडी करत अज्ञात चोरट्यांनी रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली असून याबाबत पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की , खंडेराव नगर येथील रहिवासी विजय सुभाष पांढरे घरामध्ये झोपलेले असताना अज्ञात चोरट्याने यांच्या घरातून 50 हजार रुपये कॅश व साडेतीन तोळे सोने असे एकूण अडीच लाख रुपये किमतीचे एवज चोरुन नेला. आज सकाळी विजय पांढरे झोपेतून जागे झाले असता सदर प्रकार त्यांच्या लक्षात आला.
विजय पांढरे यांनी नुकताच शेतातील मक्का विक्रीचे पैसे व्यापाऱ्यांकडून आणले होते.तसेच घरातील आई व पत्नी, वहिनी यांचे दाग दागिने घरातील कपाटामध्ये ठेवलेले होते. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात विजय सुभाष पांढरे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसर्या घटनेत त्यांच्या शेजारी असलेले धनराज शामराव देशमुख यांच्या घरातील 13 हजार रुपये कॅश व घरातील वस्तू अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची उघकीस आले. दरम्यान, वाढत्या चोरांच्या घटनेमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहे. तरी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढावी अशी मागणी नागरिकामाधून होत आहे.