साईमत लाईव्ह भुसावळ प्रतिनिधी
जामनेररोड वरील संतधाम परीसरातील श्री सप्तश्रृंगी देवीच्या मंदिरात सोमवारी नवरात्रोत्सवानिमीत्त भाविकांच्या उपस्थितीत घटस्थापना करण्यात आली. घटपुजन मिलिंद कुळकर्णी यांनी केले, त्यांना दिनेश साहु, पुर्वा कुळकर्णी, किर्ती ठाकूर व प्रिया कुळकर्णी यांनी सहकार्य केले.
भाविकांनी देवीचे दर्शन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.