Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»मुंबई»कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र?…….सुप्रिया सुळेंची खोचक टीका
    मुंबई

    कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र?…….सुप्रिया सुळेंची खोचक टीका

    SaimatBy SaimatAugust 2, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी 

    माझ्या मनातही आले नव्हते पण, भाजपच्याच एका नेत्याने मला सांगितले की, हे सरकार एक दुजे के लिये सरकार आहे. राज्यात पावसामुळे शेतीचे नुकसान झाले, पण प्रत्येक खात्याला ऑन फिल्ड मंत्री नाही हे दुर्दैव आहे, महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय? अशी टीका राष्ट्रवादीच्या नेत्या आणि लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे- फडणवीस सरकारवर केली.

    लढणाऱ्या लेकींचा सार्थ अभिमान

    सुप्रिया सुळे म्हणाल्या, देशाची अर्थव्यवस्था चांगलीच व्हावी, ही अपेक्षा होती त्यामुळे सुदृढ चर्चा व्हावी असे वाटते. देशाची काय परिस्थिती आहे त्यात सुधारणा करता येईल का? यावर विचार करत आहे. मविआतील तीन नेत्यांवर कारवाया झाल्या आहेत. या तिन्ही केसेसनंतर त्यांच्या कुटुंबीयातील लेकी सार्थ लढत आहेत. याचा मला अभिमान आहे.

    कुटुंबीय भक्कम मागे

    सुप्रिया सुळे म्हणाले, तिन्ही कुटुंबात अडचणी आहेत. सत्य जेही समोर येईल तेव्हा जास्त आनंद होईल जे खरे आहे ते नक्कीच बाहेर येईल. देशमुख फॅमिली असो की राऊत, त्यांचे कुटुंबीय भक्कमपणे मागे आहेत.

    पवारांची मैत्री सर्वश्रुत

    सुप्रिया सुळे म्हणाल्या, शरद पवार आणि संजय राऊत यांचे संबंध चांगले आहेत. पवारांची मैत्री उभ्या महाराष्ट्राने पाहिली आहे. सत्ताधाऱ्यांना टीका करण्याशिवाय काही येत नाही.

    भाजपचेच लोक म्हणाले..

    सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझ्या मनातही गोष्ट नव्हती, पण भाजपच्याच एका नेत्याने मला सांगितले की, हे सरकार एक दुजे के लिये सरकार आहे. माझ्या लोकसभा मतदारसंघात कामे असतील तर आम्ही पालकमंत्र्यांकडे जात होतो, आज पालकमंत्रीच नाहीत. राज्यात प्रत्येक खात्याला ऑन फिल्ड मंत्री नाही हे दुर्दैव आहे. महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय?

    आदित्य यांच्या दौऱ्यांना यश मिळतेय

    सुप्रिया सुळे म्हणाल्या, आदित्य ठाकरे कष्ट करत आहेत, जो लढतो त्यांना लोक प्रतिसाद देतात. एकनाथ शिंदेंनी धमकी दिली या बाबींची आता सवय लागली आहे. जो राज्याला न्याय देईल, गरिबांना साथ देतील त्यांना लोक यश देतात. आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यांना यश येत आहेत.

    सावंताच्या मागे आम्ही राहू

    सुप्रिया सुळे म्हणाल्या, तानाजी सावंत यांचे कार्यालय फोडले गेले तर त्यांनी पोलिसांत जावे. अजून तरी या देशात लोकशाही आहे. त्यामुळे त्यांच्या मागे आम्हीही उभे राहू त्यांनी पोलिस ठाण्यात जायला हवे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Railways : एलपीजी टंचाईने रेल्वे खानपान सेवा धास्तावली

    March 11, 2026

    आसाममध्ये सुखोई-३० एमकेआय विमान कोसळले; नागपूरचे सुपुत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर वीरमरण पावले

    March 6, 2026

    Devendra fadnavis : 78,215 मेगावॅट वीज निर्माणासाठी जलविद्युत प्रकल्पाला ग्रीन सिग्नल

    March 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.