Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»धुळे»शरद पवारांचा धुळ्यात दौरा ; राष्ट्रवादी भवनाचे अनावरण पवारांच्या हस्ते
    धुळे

    शरद पवारांचा धुळ्यात दौरा ; राष्ट्रवादी भवनाचे अनावरण पवारांच्या हस्ते

    SaimatBy SaimatJuly 29, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत लाईव्ह शिरपूर प्रतिनिधी :

    धुळे येथे राष्ट्रवादी भवनचे नूतनीकरण झाले आहे. त्याच्या अनावरण कार्यक्रमासाठी शरद पवार  शनिवारी(२९जुलै) येणार आहेत. त्यांच्या दौऱ्यामुळे उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळ मिळणार आहे. धर्मांध शक्तीविरोधात ठामपणे उभे राहण्यासाठी व शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी या कार्यक्रमातून बळ मिळेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी सांगितले.

    खासदार पवार हे नाशिकहून शनिवारी (३०जुलै) ला धुळ्याकडे निघतील. त्यांचे सकाळी ११.३० धुळ्यात आगम होईल. मिरवणुकीने ते दुपारी बाराला गुलमोहर विश्रामगृहात उपस्थित होतील. दुपारी साडेबारापर्यंत ते शिष्टमंडळे व कार्यकर्त्यांशी हितगुज साधतील. नंतर दुपारी पाऊण ते अडीचपर्यंत राष्ट्रवादी भवनाच्या नूतनीकरणाचे अनावरण त्यांच्या हस्ते होईल. पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर ते दुपारी साडेतीनपर्यंत मल्हार बागेत असतील. तेथून नाशिकला रवाना होतील, अशा नियोजीत दौऱ्याची माहिती श्री. गोटे यांनी दिली.

     

    राष्ट्रवादी भवनामधील कार्यक्रमासह खासदार पवार यांच्या स्वागतासाठी सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे,असे आवाहन माजी मंत्री हेमंत देशमुख, माजी आमदार रामकृष्ण पाटील यांनी केले.

    शिष्टमंडळात समाविष्ट होणाऱ्या सदस्यांनी आपली नावे राष्ट्रवादी भवनात द्यावीत. तेथे प्रवेशसाठी पासेस दिले जातील. पासशिवाय कोणालाही पवार भेटणार नाहीत. राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमस्थळी जमावे, असे आवाहन अनिल गोटे यांनी केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Run for Unity : ‘रन फॉर युनिटी’तून एकतेचा संदेश; धुळेकरांचा उत्स्फूर्त सहभाग

    October 31, 2025

    Dondaicha Case: दोंडाईचा येथील प्रकरण : माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटलांच्या शेतजमिनीवर रावल कुटुंबियांचा कब्जा

    September 28, 2025

    ‘Kanbais’, The Immersion : धुळ्यात पांझरा कान नदीवर ‘कानबाईंचे’ जयघोषात शांततेत विसर्जन

    August 5, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.