अपघातात साडेचार वर्षाचा मुलाचा तुटला पाय तर वडिलांचा मृत्यू

0
21

अमळनेर : प्रतिनिधी
येथील धुळे रस्त्यावर झालेल्या अपघातातील जखमी युवकाचा, धुळे येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना २६ रोजी रात्री मृत्यू झाला. धुळे-अमळनेर रस्त्यावरील स्वादिष्ट नमकीनजवळ २५ रोजी रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास, ओव्हरटेक करताना चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिली होती.

या धडकेत दुचाकीवरील साडेचार वर्षांच्या बालकाच्या पाय तुटला होता. तर दुचाकीचालक चालक कैलास नंदलाल पाटील यांच्या पायाला दुखापत होऊन ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर धुळे येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान २६ रोजी रात्री त्यांचा मृत्यू झाला. मृत कैलास पाटील यांच्या पश्यात पत्नी, २ मुले, आई, वडील असा परिवार अाहे. जानवे येथे २७ रोजी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here