Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»गोलमाल ; बांधकाम विभागातील कामे वाटप व कागदपत्रे अफरातफर प्रकरण जळगाव जि.प.तील अधिकाऱ्यांसमोर कोणाची ना चाले
    जळगाव

    गोलमाल ; बांधकाम विभागातील कामे वाटप व कागदपत्रे अफरातफर प्रकरण जळगाव जि.प.तील अधिकाऱ्यांसमोर कोणाची ना चाले

    SaimatBy SaimatJuly 8, 2022Updated:July 8, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : विशेष प्रतिनिधी

    जळगाव जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागातील शासकीय कामे वाटप आणि कागद पत्रे अफरातफर प्रकरणाचा मागील आठवड्यापासून जिल्हाभर गाजावाजा सुरु असून लेखा सहाय्यक पी. एम. पाटील अद्यापही समोर आलेले नाहीत.  दरम्यान जि.प.तील अधिकाऱ्यांसमोर कोणाचीही दाळ शिजत नसल्याचे चित्र समोर येऊ लागले आहे.
    पी.एम.पाटील यांच्यावर कडक कार्यवाहीची बडतर्फी वा फौजदारी गुन्हे नोंद झाल्यास तपासात वरिष्ठ कार्यकारी अधिकारी श्री.धिवरे तसेच उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.मोहन ह्यांची पूर्ण पोल खुलेल म्हणून ताबडतोब तत्वावर पी.एम.पाटील ह्यांची दुसऱ्या विभागात बदली देण्यात आली आहे.मुद्दाम पी.एम.पाटील यांना सावलीत ठेवून, वरिष्ठ अधिकारी आपआपली कातडी वाचवण्यासाठी धडपडत आहेत.
    आज सूचक सुत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीअन्वये, सदर प्रकरणाची दखल स्थानिक प्रशासनाने घेतली नाही  परंतु  मुंबईकडे या प्रकरणाची तार  जुळल्याची माहिती  मिळत आहे. सीईओंसुद्धा संशयास्पद भूमिकेत राहून प्राप्त झालेल्या लेखी तक्रारींना चव्हाट्यावर ठेवतांना दिसत आहेत.जरी प्रकरण सीईओ पंकज आशिया यांच्या कार्यालयासमोर झाले. एकाच इमारतीत दोषी आणि वरिष्ठ अधिकारी आपआपल्या टेबलावर विविध तक्रारदारांनी दिलेल्या तक्रारींची प्रत जरी घेऊन बसलेत तरी आजपावेतो शून्य  कार्यवाही होऊन सदर प्रकरण अति शुल्लक असल्याचा भास निर्माण करण्यासाठी पूर्ण शक्तीनिशी हे अधिकारी दिवसरात्र एक करतांना दिसत आहेत.
    जरी , प्रकरण मातीमध्ये दाबले तरी तक्रारी तसेच तक्रारदार हे जिवंत आहेत. सदर घटनेची जिल्हा भरात पडसाद पडण्याची शक्यता आहे. कारण सुशिक्षित बेरोजगार आणि त्यांच्यासोबत झालेला हा अन्याय तसेच शासकीय यंत्रणा वापरून चालू असलेला हा आर्थिक घोळ किती दिवस न्याय मिळण्याची वाट बघेल हे बघण्याजोगे राहील. एवढ्या प्रमाणावर झालेला आर्थिक घोळ तब्बल 10 टक्के इतपत कामांची रक्कम सदर अधिकाऱ्यांनी लाटली असल्याचाही  आरोप आहे. ज्यांनी या रकमा जमा करून अधिकाऱ्यांना दिल्या त्यांना नियमावली बाहेर अतिरिक्त ज्यादा काम देऊन अधिकाऱ्यांनी कामे वाटप केली. सदर प्रकरणाकडे पूर्ण जिल्हावासियांचे लक्ष लागून आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Chop : चोपड्यातील वाहतूक हवालदार निलंबित

    January 31, 2026

    Jalgaon : जळगावात प्रभू श्री विश्वकर्मा जयंती उत्साहात

    January 31, 2026

    Jalgaon : हेल्मेट रॅलीतून जळगावमध्ये वाहतूक सुरक्षा संदेशाची जोरदार पध्दत

    January 31, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.