Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»मुंबई»खडसेंनी व्यक्त केली कृतज्ञता ; शरद पवारांनी मदत केली नसती तर नाथाभाऊ होत्याचा नव्हता झाला असता
    मुंबई

    खडसेंनी व्यक्त केली कृतज्ञता ; शरद पवारांनी मदत केली नसती तर नाथाभाऊ होत्याचा नव्हता झाला असता

    SaimatBy SaimatJune 27, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी :-

    संकट काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी मदत केली नसती तर नाथाभाऊ होत्याचा नव्हता झाला असता,असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि नवनियुक्त आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केले आहे.

    भाजपमध्ये असताना मी प्रामाणिकपणे काम केले. मात्र तरीही माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. राजकारण इतक्या खालच्या स्तराला जाते हे आयुष्यात पहिल्यांदा अनुभवले आहे. यानंतर माझ्या कुटुंबालाही त्रास देण्यात आला.

     

    गेल्या आठवड्यात माझ्या बँकखाते गाेठवून खात्यात एक रुपयाही ठेवलेला नाही. त्यानंतर राहते घर १० दिवसांत रिकामे करण्याची नोटीस आली. न्यायालयातून जाऊन स्टे आणला म्हणून त्या घरात राहत आहे. माझ्या हातात इतकी ताकद आणि शक्ती आहे की अनेकांना देशोधडीला लावू शकतो. पण असा विचार मी करत नाही.

    एकनाथ शिंदे यांनी अनेक आमदारांसोबत केलेल्या बंडखोरीवर पहिल्यांदाच खडसे यांनी कल्याणमध्ये भाष्य केले. राज्याच्या राजकारणात ज्या काही घडामोडी सुरु आहेत. तो शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र, यामागे कोणती तरी मोठी शक्ती आहे. हे सगळे घडत आहे, त्यासाठी कुणी तरी ताकद दिल्याशिवाय एकनाथ शिंदे (Eknath Shinde) इतके धाडस करणार नाहीत. कोण त्यांच्या पाठीमागे आहे, हे भविष्यात समोर येईलच,असे विधान खडसे यांनी केल्याने उलट -सुलट चर्चा रंगल्या आहेत.

    कल्याण-डोंबिवली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस व खान्देश ज्ञाती समाजातर्फे खडसे यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. ४० वर्षांत असे राजकारण मी अनुभवले नव्हते. राज्यात अस्थिरतेचे वातावरण आहे. शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी बंड पुकारला आहे. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. पण तांत्रिक प्रश्नांची सोडवणूक न्यायालय करू शकेल, अशी स्थिती आहे,असे खडसे म्हणाले. खडसे यांच्या सत्कार सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Railways : एलपीजी टंचाईने रेल्वे खानपान सेवा धास्तावली

    March 11, 2026

    Devendra fadnavis : 78,215 मेगावॅट वीज निर्माणासाठी जलविद्युत प्रकल्पाला ग्रीन सिग्नल

    March 5, 2026

    कलाविश्वावर शोककळा; ‘देवदास’ फेम अभिनेते विजय कृष्णा यांचं निधन, वयाच्या ८१व्या वर्षी घेतला निरोप

    March 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.