खासदार श्रीकांत शिंदे यांचे कार्यालय शिवसैनिकांनी फोडले

0
9

मुंबई :- मुबंईत शिवसैनिक शिवसनेच्या बंडखोर नेत्यांच्या कार्यालयांवर हल्ले करत आहेत. आज सकाळी उल्हासनगर येथे शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांचे कार्यालय शिवसैनिकांनी फोडले. श्रीकांत शिंदे  हे बंडखोरांचे नेते एकनाथ शिंदे  यांचे पुत्र आहेत. पुण्यातही बंडखोर आमदार तानाजी सावंत यांचे कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेनेच्या ३७ पेक्षा जास्त आमदारांनी एकनाथ शिंदेंना समर्थन दिले आहे. त्यामुळे शिंदें विरुद्ध उद्धव ठाकरे असा संघर्ष निर्माण झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here