Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»ट्रॅफिक विभाग वाहतूक सुरक्षित करण्यासाठी की वसुलीसाठी?
    क्राईम

    ट्रॅफिक विभाग वाहतूक सुरक्षित करण्यासाठी की वसुलीसाठी?

    SaimatBy SaimatJune 18, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ः प्रतिनिधी
    ट्रॅफिक विभागाचे काम काय आहे, वाहतूक सुरळीत करणे की वसूली करणे? एका बाजूला वाहतूक कोंडी झालेली असताना वाहतूक पोलिस त्याकडे दुर्लक्ष करून वाहनचालकाकडे कागदपत्रे तपासून वसूली करतात. त्यांना विचारले असता, आम्हाला वरुन टार्गेट देण्यात आले असल्याचे सांगतात. त्यांना कोणी टार्गेट दिले आहे का? असा गंभीर आरोप माजी पालकमंत्री तथा भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी काल जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केला. नियोजन भवनात ही बैठक झाली.

    पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या प्रश्नावर पुढील आठवड्यात बैठक घेण्याची सूचना देऊन विषयावर तात्पुरता पडदा टाकला. शहरात प्रवेश करणाऱ्या रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या नित्याचीच झाली आहे. ती सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांची नेमणूक असताना ते कोंडी सोडवण्याऐवजी ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांची कागदपत्रे तपासून दंड वसुली करतात. त्यांना असे काही टार्गेट दिले आहे का? आणि ते कोणी दिले आहे? असा प्रश्न आमदार सावकारेंनी उपस्थित केला. महामार्गावर वेग मर्यादेचे फलक नसताना वाहतूक पोलिसांकडून वेग मर्यादा तोडल्याने दंडात्मक कारवाई केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

    संयुक्त बैठक लावण्याचे आदेश
    चिखली ते तरसोद दरम्यान महामार्ग चौपदरीकरण झालेले नसताना मक्तेदाराकडून टोलवसुली केली जात आहे. त्याबाबत फलक लावून महिन्याची पास काढण्याबाबत जाहिर सूचना लावण्यात आल्याचे सांगितले.ही वसूली ताबडतोब बंद करण्याची मागणी देखील त्यांनी केली.वाहतूक पोलिसांची वसूली व महामार्गावरील टोल आकारणी या प्रश्नाबाबत जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि न्हाईचे अधिकारी यांची संयुक्त बैठक लावण्याचे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon : नेरी नाका परिसरातील रस्ता तात्पुरता बंद

    February 7, 2026

    Jalgaon : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे १२ फेब्रुवारीला ठिय्या आंदोलन

    February 7, 2026

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.