Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»ट्रकमध्ये कत्तलीसाठी गायी घेऊन जाणार्‍या चौघांना अटक
    क्राईम

    ट्रकमध्ये कत्तलीसाठी गायी घेऊन जाणार्‍या चौघांना अटक

    SaimatBy SaimatJune 17, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुक्ताईनगर : प्रतिनिधी
    येथून जवळ असलेल्या पुरनाड फाट्याजवळ रात्रीच्या सुमारास एका ट्रकमधून निर्दयीपणे कत्तलीसाठी गायी घेऊन जाणार्‍या ट्रक व चौघांना ताब्यात घेतले आहे.
    सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातून अनेकदा परराज्यातून गुरांची वाहतूक करणारी वाहने जात असतात. पोलीस अनेकदा या प्रकारच्या धडक कारवाया करत असतात. अशीच एक कारवाई काल रात्री पाऊण वाजेच्या सुमारास तालुक्यातील पुरनाड फाटा येथे झाली आहे.
    पुरनाड फाट्याजवळून एचआर ५५ डब्ल्यू-८५६१ या क्रमांकाच्या ट्रकमधून गायींची अतिशय निर्दयीपणे वाहतूक करून त्यांना कत्तलीसाठी नेले जात असतांनाची माहिती पोलिसांना मिळाली होती. या अनुषंगाने पुरनाड फाट्याजवळ पोलिसांनी या ट्रकला अडविले असता याच्या चालकासह चौघे जण ट्रक टाकून पळण्याच्या प्रयत्नात असतांना त्यांना पोलिसांनी शिताफीने अटक केली. यात पोलिसांनी सुमारे २ लाख ४० हजार रूपयांच्या १२ जर्सी गायींची मुक्तता केली असून सुमारे पाच लक्ष रूपयांचा ट्रक जप्त केला आहे.
    दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी या ट्रकचा चालक साबीर इस्माईल (रा. बुरा का जिल्हा नुह राज्य हरियाणा) तसेच अब्दुल सत्तार अब्दुल गफार( ता मावना जिल्हा किठोर उत्तर प्रदेश); वसीम आस मोहम्मद (ता सयीदपूर मोदी नगर उत्तरप्रदेश); साहिल खान सपात खान (ता पोटला तह नूह उत्तर प्रदेश ) या चौघांच्या विरूध्द मुक्ताईनगर पोलीस स्थानकात अंकुश बाविस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सी सी टी एन एस नंबर २१०/२०२२; भादंवि ३४ सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चे सुधारित २००५ चे कलम ९, ११ (१); (ए); (एफ), (एच); (के); (आय) प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ९ ११ आणि महाराष्ट्र मोटार वाहन अधिनियम८३/१७७प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस निरिक्षक शंकरराव शेळके यांच्या मार्गदर्शनाखालील उप निरिक्षक शेवाळे, पोहकॉ जवरे, अंकुश बाविस्कर, धर्मेंद ठाकूर यांच्या पथकाने केली. या चौघांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon : स्वच्छतेवर कारवाईची चेतावणी महापौर दीपमाला काळे प्रशासनावर संताप

    February 17, 2026

    Jalgaon / Wakdi : महसूल पथकाला पाहताच ट्रॅक्टर चालक घेवून पसार वाळूमाफियाचा कारनामा 

    February 17, 2026

    Dharangaon : धरणगाव औद्योगिक वसाहतीतील भंगार गोडाऊन खाक

    February 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.