गेल्या दोन दिवसांपासून पूर्वमोसमी पावसाने लावली हजेरी

0
64

जळगाव ः प्रतिनिधी
कापूस लागवडीला वेग आला आहे. गेल्या आठवडाभरात बागायती कापूस लागवडीची लगबग सुरू झाली आहे. तब्बल दीड लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड पूर्ण झाली आहे.

जिल्ह्यात पाच लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड होत असते त्यापैकी दोन लाख हेक्टरवर बागायती कापसाची लागवड होते. यावर्षी ठिबक सिंचनावर ही लागवड वाढली आहे. कापसाला गेल्या हंगामात मिळालेल्या चांगल्या दरामुळे यावर्षी कापसाच्या क्षेत्रात मोठी वाढ झालेली आहे.

3 जूनपासून कापसाच्या बियाणे विक्रीवरील बंदी उठवल्यानंतर ठिबकवरील कापूस लागवडीला वेग आला आहे. जवळपास दीड लाख हेक्टर क्षेत्रावरील कापसाची लागवड पूर्ण झाली आहे. पावसामुळे वेग… पूर्वमोसमी पावसाने जिल्हाभरात हजेरी लावली आहे. पुढील आठवड्यात मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवर कापूस लागवडीला वेग आला आहे.
जिल्ह्यात जवळपास 25 लाख कापूस बियाणे पाकिटांची विक्री झालेली आहे. मान्सूनचे आगमन झाल्यानंतर खरिपाची अन्य पिकांच्या पेरणीची लगबग सुरू होईल. जिल्ह्यात बहुतांश भागात पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावल्याने, शेतकऱ्यांची आशा पल्लवित झाली आहे. त्यामुळे पेरणीसाठी शेतकऱ्यांनी सर्व तयारी पूर्ण करून ठेवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here