Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»चाळीसगाव»मराठा सेवा संघाची चाळीसगाव शहर व तालुका कार्यकारिणी जाहीर
    चाळीसगाव

    मराठा सेवा संघाची चाळीसगाव शहर व तालुका कार्यकारिणी जाहीर

    SaimatBy SaimatJune 14, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
    चाळीसगाव प्रतिनिधी 
    मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष-प्रशांत गायकवाड व तालुका अध्यक्ष-अरूण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.तरी या बैठकीत शहराध्यक्ष प्रशांत गायकवाड यांनी मराठा सेवा संघाचे धेय,धोरण काय असेल आपल्याला संघाच्या माध्यमातून सर्व सामान्य जनतेच्या हितासाठी अनेक सामाजिक उपक्रम राबवायचे आहेत असे सुतोवाच त्यांनी केले.
    त्यानंतर शहराध्यक्षांनी कार्यकारिणीचे इतर पदाधिकारीची निवड जाहीर केली.त्याप्रमाणे मराठा सेवा संघाच्या शहर कार्यकारिणीच्या उपाध्यक्ष पदी-श्री.अजय गोपाळराव देशमुख,श्री.आण्णासाहेब कृष्णा धुमाळ,श्री.हर्षल आत्माराम पाटील, श्री.खुशाल रेवजी पाटील, कार्याध्यक्षपदी-संजीव हिरामण पाटील,श्री.सुनील तुळशीदास चव्हाण, सचिवपदी-श्री.मनोहर जोहरमल सुर्यवंशी, सहसचिव-श्री.समाधान हिरामण बच्छाव कोषाध्यक्षपदी-चंद्रकांत धर्मा पाटील, सहकोषाध्यक्ष-श्री.विजय जिभाऊ पाटील, शहरसंघटक-श्री.योगेश राजधर पाटील,श्री.राकेश भास्करराव राखुंडे, श्री.राजेंद्र सर्जेराव मांडे, सौरंभ अनिल पाटील, कार्यकारिणी सदस्यपदी- श्री.आर.बी.जगतापसर, श्री.किशोर साखरचंद पाटील उद्योजक आघाडी च्या अध्यक्षपदी- श्री. कुणाल जगन्नाथ पाटील, तर शहर आणि ग्रामीण विभागासाठी संयुक्त, तज्ञसल्लागार पदी- डाॅ.जयवंत देवरे, डाॅ.संजीव पाटील, श्री.सुधीरआबा पुंडलिक पाटील,श्री.धनंजय यशवंत चव्हाण श्री.अविनाश फकिरराव देशमुख,यांची निवड जाहीर करण्यात आली.त्याचप्रमाणे प्रमाणे तालुका अध्यक्ष अरुण पाटील यांनी ग्रामीणची कार्यकारिणी जाहीर केली, उपाध्यक्षपदी-श्री.दिपक गुलाबराव पाटील,श्री.   भाऊसाहेब दिनकर पाटील,श्री.नितीन अरूण पाटील,श्री.प्रकाश नगराज पाटील,श्री.किशोर साहेबराव सुर्यवंशी, सचिवपदी-श्री.समाधान भिमराव पाटील, सहसचिव-श्री.एन.एम. पाटील सर,कार्याध्यक्ष- श्री.धनंजय सुकदेव मांडोळे,श्री.निलेश सुभाष पाटील, ता.संघटक-श्री.विजय सुभाषराव शितोळे, कोषाध्यक्ष- डाॅ.अजय पाटील, समन्वयक- श्री.बी.ए.पाटील यांची निवड करण्यात आली.त्यानंतर उपस्थित पदाधिकारी बांधवांना शहराध्यक्ष-प्रशांत गायकवाड,ता.अध्यक्ष-अरूण पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
    त्यानंतर शहरसचिव-मनोहर.    सुर्यवंशी सरांनी बोलुन दाखवले की संघाचे शहराध्यक्ष प्रशांत गायकवाड सरांनी मला सचिव पदाची दिलेली जबाबदारी मी नक्कीच योग्य पद्धतीने सांभाळेल परंतु मला एक पश्चात्ताप होतोय की या ठिकाणी सर्वच क्षेत्रातील मान्यवर उपस्थित आहे.आणि ही वास्तव परिस्थिती पाहता मी जर १० वर्ष अगोदर संघाशी जोडल्या गेलो असतो तर निश्चितच माझे शैक्षणिक क्षेत्रातील आजचे कार्य फार वेगळे राहिले असते.परंतु या पुढे मला मराठा सेवा संघासाठी जेवढे शक्य होईल तेवढे मी चांगले कार्य करण्याचा प्रयत्न करणार आहे.तरी शहराध्यक्ष-प्रशांत गायकवाड व ता. अध्यक्ष-अरूण पाटील यांनी असे देखील सांगितले की आपल्याला मराठा सेवा संघाची तालुक्यात गाव तिथे आणि शहरात वार्ड तेथे मराठा सेवा संघाची शाखा स्थापन करायची आहे. तसेच दिवाळी नंतर मराठा सेवा संघाचे उत्तर महाराष्ट्र विभागाचे चाळीसगाव येथे दिवाळी नंतर फार मोठे अधिवेशन भरवायचे‌ आहे.यावर देखील चर्चा घडवून आणली तरी नवनिर्वाचित सदस्यांचे सर्व स्तरातून स्वागत आणि अभिनंदन होत आहे
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Chalisgaon : औट्रम घाटाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

    December 19, 2025

    Chalisgaon : वॉर्ड क्रमांक १६ बाराभाई मोहल्ल्यात पथदिवे बंद तर गटारी तुंबल्या

    December 18, 2025

    Chalisgaon : चाळीसगाव तालुक्यात अवैध मुरूम उत्खनन सर्रासपणे सुरू

    December 12, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.